रूसलेली मैत्रीण

माझा फोन वाजला 

हॅलो .. मी म्हणालो.

अरे ती खूप आजारी आहे..तो म्हणाला.

ती कोण ती.. मी म्हणालो.

अरे ती तुझी जीवलग मैत्रीण आठवतंय ना..  तो म्हणाला.

मला काय आठवत नाही.. मी म्हणालो.

आम्ही सगळे तिला बघायला हॉस्पिटल मध्ये चाललोय तुला यायचं असेल तर ये..तो म्हणाला.

हो ते माझं मी बघतो.‌ मी म्हणालो.

मी असं म्हणालो  तरी त्यांनी मला गाडीत बसून तिकडे नेलच जाताना वाटेत मी आठवणीत रमलो.

काय झालं..मी म्हणालो.

काही नाही एक प्रॉब्लेम आहे.. ती म्हणाली.

अग मग मला सांग ना..मी म्हणालो.

काल परवा मी आजारी होते म्हणून माझा सगळा अभ्यास तसाच आहे आणि सरांनी माझी वही मागितली आहे आता सरांना कळेल की माझा अभ्यास बाकी आहे ते .. ती म्हणाली.

मग त्यात काय एवढं.. मी म्हणालो.

मला सरांची खूप भीती वाटते..ती म्हणाली.

सर काय खातात का तुला,, मी हसत हसत म्हणालो.

पण ती खूप हिरमुसली होती.

ही घे माझी वही जा दाखव सरांना.. मी म्हणालो.

Thank you..  ती म्हणाली 

तिने माझ्या वही मधून माझं नाव खोडून माझी वही नेली आणि थोड्यावेळात मला परत आणून दिली.


काही दिवसांनी

ऐक ना मी नाटकात भाग घेतलाय तु माझे संवाद पाठ करून घेशील का.. ती म्हणाली.

ए जा ग आज मला खूप अभ्यास आहे.. मी म्हणालो.

काही वेळाने 

बरं चल आता असं तोंड पाडून बसू नकोस मी घेतो तुझं पाठांतर.. मी म्हणालो.


तिने नाटकात चांगलं काम केल्याबद्दल तिला बक्षीस मिळालं 


काही दिवसांनी 

आमच्या  कॉलेजच्या बाहेर कॉलेज सुटल्यावर  ती घरी जात असताना काही पोरं तिला त्रास देत होती तेंव्हा मी तिच्या सोबतच होतो मग मी त्यांचा चांगलाच समाचार घेतला मग ती पोरं घाबरून पळून गेली.

आमची मैत्री, दोस्ती, यारी सगळ्या कॉलेजला माहिती होती  सगळ्या कॉलेज मध्ये आमची मैत्री खूपच फेमस होती सगळ्यांनाच आमच्या मैत्रीचा खूप हेवा वाटायचा आम्ही दोघं कायम एकमेकांच्या सोबतच असायचो.

तर अशी एकदम मस्त लय भारी होती आमची दोस्ती, यारी, मैत्री.

एकदा आम्ही सगळे सहलीला गेलो असताना आमच्यात थोडंसं भांडण झालं.

ती काहीच न बोलता निघून गेली.

दुसऱ्या दिवशी.

तिला ताप आला.

ती खूप आजारी पडली दोन दिवसांतच ती खूपच अशक्त झाली तिची अवस्था बघून मी खूप घाबरलो.

यांची काळजी घ्या नाहीतर  त्यांचा ताप यांच्या डोक्यात जाऊ शकतो.. डॉक्टर म्हणाले.

हो मी घेतो तिची काळजी.. मी म्हणालो.

मला काहीच सुचेना माझा जीव खूप कासावीस झाला 

अरे तिला फक्त ताप आलाय तिचा जीव नाही गेलाय तु कशाला एवढा कासावीस होतोस.. तो म्हणाला.

काही दिवसांनी तिला जरा बरं वाटलं.

थांब मी भरवतो तुला.. मी म्हणालो.



पण ती काहीच बोलली नाही ‌


मी तुझ्यावर रागावलो ते तुला आवडलं नाही ना  तुला माझा राग सहन होत नाही ना मी आता यानंतर  कधीच तुझ्यावर  रागावणार नाही पण तु लवकर बरी हो हे बघ तुझ आजारपण मला अजिबात सहन होत नाही आता कधीच आजारी पडू नकोस प्लीज.. मी बोलतच होतो.


पण ती मात्र अजूनही शांतच होती.



काही दिवस असेच गेले. 






काही दिवस आमच्यात शांतता पसरली 




.

.
काही दिवसांनी एक दिवस 


आमच्या कॉलेज मध्ये सांस्कृतीक कार्यक्रम होता.

अरे ऐक ना मला डान्स पार्टनर भेटत नाही तु माझ्यासोबत डान्स करशील.. ती म्हणाली.

अग पण मला डान्स करता येत नाही.. मी म्हणालो.

अरे मी शिकवते ना.. ती म्हणाली.

तिने मला डान्स शिकवला.

आणि मग आम्ही संसकुतीक कार्यक्रमात एकदम कडक डान्स केला त्यासाठी आम्हाला बक्षीस पण मिळालं.


आज सकाळी सकाळीच मला तिचा फोन आला.

अरे मी खूप आजारी आहे तु संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर माझ्या घरी येऊन माझा अभ्यास घे ना.. ती म्हणाली.

मला घरी खूप काम आहेत.. मी  म्हणालो.

अरे प्लिज ये ना,. ती म्हणाली.

मी तिच्या घरी जाऊन तिचा अभ्यास घेतला.

काय झालं रडायला.. मी म्हणालो.

मी नापास झाले तर,. ती म्हणाली.


अग बाळा असं नाही करायचं अशी कशी नापास होशील तु आता मी घेतोय ना तुझा अभ्यास.. मी म्हणालो.

मी तिला समजावत होतो.

Result  च्या दिवशी तिला खूप आनंद झाला,

बघ मी पास झाले.. ती म्हणाली.

बघ मी तुला म्हणतच होतो ना की तु पास होशील म्हणून.. मी म्हणालो.

चल आपण पार्टी करु.. ती म्हणाली.

तिने आम्हाला सगळ्यांना मस्त पार्टी दिली.

असे कितीतरी प्रसंग आहेत जिथं आम्ही दोघांनी एकमेकांना खूप मदत केली 







तेवढ्यात आमची गाडी हॉस्पिटलच्या बाहेर थांबली आणि मी भुतकाळातून वर्तमानकाळात आलो 

तिची ही अवस्था बघून मला काहीच कळेना कॉलेज मध्ये कायम हसत खेळत असलेली माझी मैत्रीण आज शांत पडली होती मला तर हे सगळं बघवतच नव्हतं.

मी आत गेलो.

काय ग ओळखलस मला..मी म्हणालो.

माझा आवाज ऐकूनही ती शांतच होती.

ए तुला आठवतंय कॉलेज मध्ये असताना आपण एकमेकांचे  best friend होतो आपल्या आख्ख्या वर्गात आपली दोस्ती सगळ्यांत भारी होती तुला रोज न्यायला आणायला मीच असायचो.. exam  च्या दिवसांत मी तुझा अभ्यास करून घेत होतो.तु भूत बनून माझ्या मानगुटीवर बसला आहेस असं तु मला मस्करीत म्हणायचीस..

मी आपला एकटाच बडबडत होतो, मी थोडावेळ शांत झालो.

त्या दिवशी माझंच चुकलं मी पुन्हा बोलू लागलो..

आपले मित्र मैत्रिणी मला सांगत होते की आपण थोडावेळ तुझी वाट बघूया म्हणून पण मलाच पिक्चर बघायची इतकी एवढी घाई झाली होती  ना की मी विचार केला की आता खूप उशीर झालाय त्यामुळे आता काय तु येणार नाहीस  म्हणून आम्ही तुला सोडून गेलो म्हणजे मीच तुला सोडून गेलो तु रागारागात माझ्याशी बोलायला आलीस तेव्हा माझीच चूक असूनही मीच तुझ्यावर ओरडलो मी तुझा राग घालवण्याचा  कधी साधा प्रयत्न सुध्दा केला नाही तु माझ्या समोर आलीस की  मीच तोंड फिरवून निघून जायचो काही दिवसांनी सगळं विसरून तुच मला खूप फोन केलेस पण मी मात्र तुझा एकही फोन उचलला नाही पण sorry ग माझं चुकलं आता  Sorry म्हणतोय ना मी तुला मी परत कधीच अस करणार नाही चल आता लवकर बरी हो आपण खूप मस्ती करू.. मी माझंच बोलत होतो.


आम्ही सगळे हॉस्पिटल मधून घरी आलो.

तरीही तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरच होता मला तिची खूप आठवण येत होती, तिची खूप काळजी वाटत होती असं वाटतं होतं की आताच्या आता तिच्या समोर जाऊन तिला अगदी खूप मनापासून Sorry  म्हणावं.

काही दिवसांनी 

आज आमच्या कॉलेज मध्ये  get together  होत सगळे आले होते पण माझी नजर फक्त तिलाच शोधत होती मला वाटलं  होत की ती आतापर्यंत बरी होऊन येईल.

अरे ती नाही आली.. मी म्हणालो.

अरे  Sorry मी तुला सांगायच विसरलो अरे ती गेली रे.. तो म्हणाला.

कधी.. मी म्हणालो.

झाले आठ पंधरा दिवस आपण सगळे तिला बघायला हॉस्पिटलमध्ये मध्ये गेलो होतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच गेली ती  बरं चल तिला श्रध्दांजली वाहायचा कार्यक्रम आहे आज  फक्त आणि तु तर तिचा सगळ्यांत जवळचा मित्र चल लवकर.. तो म्हणाला.

हो आलोच ‌‌.. मी म्हणालो.

पण काही केल्या माझ्या मित्राच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसेना.

मी कॉलेजच्या गेटसमोर जाऊन उभा राहून तिची वाट पाहू लागलो.

मी तिच्या जुन्या मोबाईल नंबरवर तिला फोन केला पण तिचा फोन लागलाच नाही.

मी वेड्यासारखे तिला फोन वर फोन करत होतो 

अरे इथं काय करतोस,.. तो म्हणाला.

अरे मी तिला कधीचा फोन करतोय पण ती माझा फोनच उचलत नाही.. मी म्हणालो.

आता मात्र माझ्या या बोलण्यावर नक्की काय बोलावं हेच माझ्या मित्राला कळेना 

अरे थांब ना जरा आता ती येईल ना तुमच काय जातय इथ  मला बोलणी खावी लागतात ती रागावेल ना माझ्यावर.. मी म्हणालो.

अरे तु सावर जरा स्वतःला ती आपल्याला सोडून कायमची निघुन गेली आहे.. तो म्हणाला.

नाही ती मला सोडून कधीच जाणार नाही कॉलेज मध्ये असताना सुध्दा आम्ही दोघं कायम एकमेकांच्या बरोबरच असायचो..मी म्हणालो.

मी तसाच निघालो.

कुठे चाललास..तो म्हणाला.

अरे मी तिच्या घरी जाऊन तिला घेऊनच येतो ना थांब आलोच मी.. मी म्हणालो.

आता माझ्या मित्राला माझी खूप काळजी वाटत होती.

अरे तु जरा भानावर ये तो म्हणाला.

आपण डॉक्टरांना बोलवायचं का.. माझा अजून एक दुसरा मित्र म्हणाला.

कशाला काय झालंय मला मी बरा आहे.. मी म्हणालो.

खूप वेळ झाला तरी माझा हा गोंधळ सुरूच होता आता मात्र कोणालाच काहीच कळेना 



आता सगळे मला समजावून समजावून थकले 

तिच असं माझ्याशी काहीच न बोलता कायमच मला सोडून निघून जाणं मला सहनच होईना.

हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का होता हा धक्का पचवणं मला केवळ अशक्यच होतं हा धक्का मला पचवताच आला नाही.

सगळे मला सावरत होते समजावत होते पण मी कोणाचंच काहीच ऐकायलाच तयार नव्हतोच  

मी तिच्या शिवाय तडफडत होतो.

माझ्या मनात अनेक विचार येत होते माझ्या काळजाला असह्य वेदना होत होत्या.

पण काळजाला होणाऱ्या वेदना कधीच बोलून दाखवता येत नाहीत सांगता येत नाहीत त्या फक्त शांतपणे सहनच कराव्या लागतात.


थोड्यावेळाने मी शांत झालो  ,भानावर आलो.





काही वेळाने.


मी आमच्या कॉलेजच्या कट्ट्यावर शांत बसलो आणि माझ्या खिशातून आमचा एक सुंदर फोटो काढला जो मी जपून ठेवला होता.

म्हणजे तु मला कधीच माफ करणार नाहीस अजून रागावलीस ना माझ्यावर म्हणूनच एवढी मोठी शिक्षा दिलीस ना मला पण आता मला ही शिक्षा भोगायची नाही  गेली वीस वर्षे झाली तीच शिक्षा भोगतोय मी रोज तुझी आठवण आली तरी मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही असं दाखवून दाखवून कंटाळा आलाय आता मला तु तेव्हा सुध्दा माझी जीवलग मैत्रीण होतीस आणि आताही  फक्त तुच माझी सगळ्यांत जवळची मैत्रीण आहेस पण फक्त मी हे सगळं तुला कधीच सांगू शकलो नाही,..

काही वेळ मी निशब्द झालो.

ओके ठीक आहे म्हणजे तु तुझा निर्णय घेतलास तर मग मी पण माझा निर्णय घ्यायला मोकळा..मी आमच्या फोटतल्या  तिच्याशी बोलत होतो मला तिला  sorry  न म्हणण्याचा खूप पश्चात्ताप झाला.

आणि शेवटी मी कायमचाच गप्प झालो.

शेवटचा श्वास घेत असताना सुध्दा मी आमचा फोटो माझ्या उराशी घट्ट कवटाळला होता.

माझ्या प्राण नसलेल्या डोळ्यात सुध्दा तो पश्चात्ताप  अजूनही स्पष्टपणे दिसत होता..

जाता फक्त एकच सांगतो मित्रांनो की जसा तुम्ही तुमच्या  बायकोचा, girlfriend  चा रुसवा काढता ना तसाच मैत्रीणीचा पण रूसवा काढायला शिका कारण मैत्रीणीला सुध्दा मन असत  तिला सुध्दा भावना असतात  जी चूक मी केली ना ती चूक तुम्ही करू नका त्याच  चूकीच्या पश्चात्तापाने  आज माझा जीव गेला.

पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो  लक्षात ठेवा की मैत्रीणी  सुध्दा रूसतात कधीकधी 

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 




.




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर