पोस्ट्स

तपश्चर्या

इमेज
मी रानावनातून चालत होते पण मला रस्ताच सापडत  नव्हता  मी वाट चुकले. पण ही चुकलेली वाट नक्की कुठे जाते हेच मला माहीत नव्हतं,पण तरीही मी चालतच होते  आणि मग  मी त्या जंगलात रात्रभर भटकतच होते नक्की काय चाललंय ते माझं मलाच कळत नव्हत. मी जरा बधीर झाले होते.  माझे पाय चालून चालून खूप दुखत होते मी खूप दमले होते माझ्याकडे खायला प्यायला पण काहीच नव्हतं  शेवटी मी थकून कुठेतरी झोपले. दुसऱ्या दिवशी. सकाळ झाली तेव्हा मी झोपेतून अगदी खडबडून जागी झाले तेव्हा मी एका गुहेत होते. पण तरीही मला कांहीच कळत नव्हत , मी अगदी कावरीबावरी होऊन गेले आणि उठून इकडे तिकडे बघायला लागले. थोड्या वेळाने. त्या गुहेतच मला एक माणूस दिसला तो माणूस खूप भयानक, भयंकर दिसत होता मी त्याला बघून खूपच घाबरले . त्याची ती हनुवटी पासून ते अगदी पाया पर्यंत लांबसडक वाढलेली, पिकलेली दाढी, त्याचे ते लांबलांब लांबसडक वाढलेले केस, त्याचा चेहराही जरा विचित्रच होता, त्याला बघून कोणालाही भीती वाटावी अगदी असाच होता तो. पण त्याचे डोळे बंदच होते त्याने मला बघीतलच नव्हतं मी तिथून पळूनच चालले होते. तेवढ्यात माझ्या मागून ...

भेट

तिला रोज एक स्वप्न पडायच  पण स्वप्नात ती त्याचा चेहरा नीट पाहू शकली नाही  तिचा जीव त्याच्या भेटीसाठी आतुर झाला होता पण तो आता    नेमका कुठे आहे हे तिला माहीत नव्हतं पण तरीही ती त्यला  शोधत होती.     ती सगळ  विसरली तिला काहीच आठवेना पण  तिला फक्त तोच आठवत होता तिचा जीव त्याच्या आठवणीने व्याकुळ झाला होता.. हा रस्ता कुठे जातो हे विचारायला सुध्दा तिथं कुणीच नव्हतं ती रस्ता चुकली की काय असं तिला वाटलं.   तिच्या मनात घालमेल होत होती तिला कसलीतरी भीती वाटत होती पण तिला कसली भीती वाटतेय हे तिलाही कळतं नव्हतं. तिथं  गेल्यावर काय बोलायचं हे  तिला माहीत नव्हतं  इकडं त्याचाही बांध फुटला होता त्याच्या जीव तिच्यात गुंतलेला होता पण काय  करावं हे त्यालाही कळत नव्हतं  त्याने तिला ओझरता पाहिलं होतं तसं त्या दोघांनीही एकमेकांना ओझरत पाहील होतं पण तरीही ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते  ती येईल का, मला होकार देईल का , मी तिला आवडेल की नाही असे असे  अनेक विचार त्याच्या मनात येत होते..   तो कुठेतरी दूर होता आणि ती ...

माझं स्वयंवर

आमच्या राजवाड्यात चांगलीच लगबग सुरू झाली होती तिथं खूप गर्दी जमली होती. मी खूप आनंदात होते. आज मी किती नटले होते,सजले होते हे काही सांगायलाच नको. सगळेजण आनंदात होते सगळेच बाहेर बसून खूप आतुरतेने माझी वाट पाहत होते जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा सगळेच टक लावून फक्त माझ्याकडेच पहात होते. पण तिथं गेल्यावर मी खूप गडबडून गेले कारण तिथं खूप गर्दी होती देशोदेशीचे रामकुमार माझा नवरा होण्यासाठी एकाच रांगेत बसले होते मला आपलीं बायको बनवायला सगळेच आतूर झाले होते. आणि थोड्यावेळातच कार्यक्रम सुरू झाला. एक एक राजकुमार पुढे येत होता. सगळेच राजकुमार एकदम हुशार, तल्लख बुद्धीचे, रूपवान होते कोणालाच नाव ठेवायला जागाच नव्हती. मला सगळेच राजकुमार आवडले होते पण तरीही मी खूप बावरून गेले होते मला काहीच कळत नव्हतं. अचानक आमच्या दारात गोंधळ सुरू झाला. मला आत जाता येईल का,. कोणीतरी विचारलं. थोड्यावेळाने तो आला. तो कोण आहे हे मला माहीत नव्हतं पण  मी त्याला कुठेतरी पाहिलंय असं मला वाटत होतं. काही दिवसांपूर्वी  मी त्याला TV  वर बघितलं होतं पण मला ते आठवत नव्हत एक माणूस आत आला. अहो युवराज तुम्ही इथं काय कर...

भूकंप

आमच्या गावात खूप मोठा भूकंप झाला सगळं उध्वस्त झाल होत्याच नव्हत झाल  काळानं घाला घातला सगळ्याची सगळी स्वप्नं एका क्षणात उद्ध्वस्त झाली.  आमच्या गावातला किशोर सुट्टीला गावी आला होता . किशोर तसा खूप हुशार पोरगा तो जास्त गरीब पण नव्हता अन लय पैसेवाला बी नव्हता पण त्याला शिकण्याची आवड होती पोरगा जिद्दीनं शिकत होता. त्याच शिक्षण आता पुर्ण होत आलं होतं आता त्याची आई त्याच्या लग्नाचा विचार करत होती तिने त्याच्यासाठी पोरी बघण्याचा घाट घातला. दुसऱ्या दिवशी तो एक पोरगी बघायला जाणार होता. पण कधी काय होईल ते सांगता येत नाय आपल्या हातात काहीच नसतं  काही दिवसांनी एक दिवस अचानक. आकाशात रातीच चांदणं पडलं होतं सगळे निवांत झोपले होते .. पण रात जशी जशी सरत गेली तसं आकाशीच चांदणं ढगाआड गेल अन् काळाकुट्ट अंधार पडला पण तो अंधार कधी सरणार नाय हे कोणालाच माहित नव्हतं. किशोर गाढ झोपेत होता तो कोवळ्या वयाचा पोरगा शांत निजला होता, थोड्यावेळान अचानक  जमिनीला हदरा बसला देवाचा कोप झाला धरणी माय रागावली भूकंप झाला भूकंप झाला असं काही लोक ओरडत होते सगळा गोंधळ उडाला सगळीकडे धावपळ सुरू झाली सगळ्यांची...

हरवलेली मैत्रीण

तो आता खूप थकला होता तो कधीही मरेल असं सगळ्यांनाच वाटत होतं पण तो कोणत्या आशेवर जगत आहे हे कोणालाच माहीत नव्हतं पण तरीही तो जगत होता.. त्याच्या अंगात जराही जीव नव्हता सगळेच त्याला घरी येऊन भेटून जात होते . आपल्या कॉलेज मध्ये get together आहे अशी बातमी त्याच्या कानावर आली  त्याच्या अंगात नवा उत्साह संचारला त्याला थोडं बरं वाटायला लागलं त्याने कॉलेजला जायचं ठरवलं  त्याचे डोळे म्हातारपणात अधू झाले होते पण तरीही त्याची नजर तिलाच शोधत असायची. आज कॉलेजच्या get together ला काहीही करून तिला भेटायचच असं त्याने ठरवलं होतं पण ती येईल की नाही हे त्याला माहीत नव्हतं पण तरीही तो तिची वाट पाहत होता  आज खूप वर्षांनी कॉलेजच्या get together ला त्याला ती दिसली  त्याला खूप आनंद झाला. अग ओळखलस का मला., तो तिच्या समोर जाऊन बोलू लागला  काही वेळाने  ती सगळ्यांशी मस्त गप्पा मारू लागली पण ती त्याच्याशी एकही शब्द बोलत नव्हती. त्याला खूप वाईट वाटलं तो पुन्हा पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती काहीच प्रतिसाद देईना. नमस्कार माझ्या बायकोला विस्मरणाचा आजार आहे तिला काही आठवत...

सोळावं वरीस धोक्याच

 दोन वर्षांनंतर  मला तो खूप आवडायचा म्हणजे अजूनही मला तो खूप आवडतो  पण आता तो नेमका कुठे आहे हे मला माहीत नाही. आम्ही दोघं एकाच गावात राहायचो पण तरीही आमची एकमेकांशी फारशी ओळख  पाळख नव्हती. नंतर आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना योगायोगाने आम्ही एकाच वर्गात होतो हळूहळू आमची ओळख झाली व नंतर आमची मैत्री झाली  काही दिवसांनी  त्याचा दयाळू स्वभाव , सगळ्यांची मदत करणं , त्याच माझ्या सोबत असणं, माझी काळजी घेणं हे सगळं हळूहळू मला आवडत गेल. पण मी त्याला काही सांगायच्या आधीच तो दुसऱ्या कॉलेज मध्ये निघून गेला. आणि माझ्या मानातल माझ्या मनातच राहून गेलं. आज मला त्याची खूप आठवण येत होती. काही दिवसांनी  आमच्या कॉलेजमध्ये संस्कृतिक कार्यक्रम होता. अरे मला खूप कंटाळा आलाय,. मी म्हणाले. कसला माझा  कंटाळा आलाय की काय तुला तु या दोन वर्षांत कंटाळलीस मला., तो मसकरीत म्हणाला. नाही तुझा नाही रे या पाठांतराचा कंटाळा आलाय मला  ,. मी म्हणाले. त्याने माझ्याकडून माझं पाठांतर करून घेतलं. काही वेळाने  थोड्यावेळाने मी स्टेजवर गेले पण सगळ्यांसमोर मला काही बोलताच य...

गैरसमज

तो माझा खूप चांगला मित्र होता म्हणजे आहे आम्ही दोघं एकमेकांचे सगळ्यात जवळचे मित्र आहोत  वीस वर्षांनंतर  तो आलाय का ग,, मी म्हणाले. ते तुलाच माहिती ना तुझाच सगळ्यात जवळचा मित्र आहे ना तो,. माझी मैत्रीण म्हणाली. मी शांत झाले. काही वेळाने  तो कॉलेजच्या गेट मधून आत येताना दिसला. मला खूप आनंद झाला. सगळे एकमेकांना भेटले सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगल्या.  आम्ही दोघं एकमेकांना पाहण्यासाठी धडपडत होतो  एकमेकांशी बोलण्यासाठी कासावीस झालो होतो पण. ना तो माझ्याशी बोलत होता ना मी त्याच्याशी. काय बोलाव, कसं बोलावं तेच कळत नव्हतं  शेवटी दोघंही बोलायला लागलो पण अजूनही आमच्या दोघांच्याही नजरेत अपराधी पणाची भावना आणि वागण्यात परकेपणा होताच. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. काय करतोस सध्या,. मी म्हणाले. काही नाही तु बोल ना,. तो म्हणाला. . अरे सगळे भेटतील म्हणून आले.. मी म्हणाले. हो बर झालं आलीस,. तो म्हणाला. थोडा वेळ असाच गेला. मला माहित नव्हतं तु येणार आहेस ते,. मी म्हणाले. आलोय ना आता,. तो म्हणाला. मी माझ्या मैत्रीणी बरोबर आले., मी म्हणाले. तुझ्याकडे माझा नंबर नाही क...