भेट
तिला रोज एक स्वप्न पडायच पण स्वप्नात ती त्याचा चेहरा नीट पाहू शकली नाही
शोधत होती.
ती सगळ विसरली तिला काहीच आठवेना पण तिला फक्त तोच आठवत होता तिचा जीव त्याच्या आठवणीने व्याकुळ झाला होता..
हा रस्ता कुठे जातो हे विचारायला सुध्दा तिथं कुणीच नव्हतं ती रस्ता चुकली की काय असं तिला वाटलं.
तिच्या मनात घालमेल होत होती तिला कसलीतरी भीती वाटत होती पण तिला कसली भीती वाटतेय हे तिलाही कळतं नव्हतं. तिथं गेल्यावर काय बोलायचं हे तिला माहीत नव्हतं
इकडं त्याचाही बांध फुटला होता त्याच्या जीव तिच्यात गुंतलेला होता पण काय करावं हे त्यालाही कळत नव्हतं
त्याने तिला ओझरता पाहिलं होतं तसं त्या दोघांनीही एकमेकांना ओझरत पाहील होतं
पण तरीही ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते
ती येईल का, मला होकार देईल का , मी तिला आवडेल की नाही असे असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते..
तो कुठेतरी दूर होता आणि ती डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारी साधी भोळी सरीता आणि तो कणखर साऱ्या संकटांना तोंड देत जगणारा सागर.
तसा त्यानेही त्याच्या आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या वादळांचा सामना केला होता पण या क्षणी तोही हळवा झाला होता
दोघांचीही भेट होणं केवळ अशक्य च होत
पण ती आली त्याला भेटायला खाचखळग्यातून वाट काढत काढत, भटकत रस्ता चुकत अनेक डोंगरवाटा तुटवत ती आली
आणि शेवटी त्यांची भेट झालीच
ते दोघं भरल्या डोळ्यांनी एकमेकांना पाहत होते मग ते दोघं अलगद एकमेकांच्या मिठीत विसावले
आणि सुखाने संसार करु लागले
नदी असो किंवा माणूस दोघांचंही प्रेम सारखंच असतं
नदीला सागराची आणि प्रियसीला प्रियकराची ओढ सारखीच असते
नदी वाहते
वाट पाहते
कानी सागराची
गाज ऐकू
येताच तिला
त्याच्या भेटीची
आस लागते
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा