तपश्चर्या








मी रानावनातून चालत होते पण मला रस्ताच सापडत  नव्हता  मी वाट चुकले.


पण ही चुकलेली वाट नक्की कुठे जाते हेच मला माहीत नव्हतं,पण तरीही मी चालतच होते 


आणि मग 

मी त्या जंगलात रात्रभर भटकतच होते नक्की काय चाललंय ते माझं मलाच कळत नव्हत.

मी जरा बधीर झाले होते.

 माझे पाय चालून चालून खूप दुखत होते मी खूप दमले होते माझ्याकडे खायला प्यायला पण काहीच नव्हतं 

शेवटी मी थकून कुठेतरी झोपले.

दुसऱ्या दिवशी.

सकाळ झाली तेव्हा मी झोपेतून अगदी खडबडून जागी झाले तेव्हा मी एका गुहेत होते.

पण तरीही मला कांहीच कळत नव्हत , मी अगदी कावरीबावरी होऊन गेले आणि उठून इकडे तिकडे बघायला लागले.

थोड्या वेळाने.

त्या गुहेतच मला एक माणूस दिसला तो माणूस खूप भयानक, भयंकर दिसत होता मी त्याला बघून खूपच घाबरले .

त्याची ती हनुवटी पासून ते अगदी पाया पर्यंत लांबसडक वाढलेली, पिकलेली दाढी, त्याचे ते लांबलांब लांबसडक वाढलेले केस, त्याचा चेहराही जरा विचित्रच होता, त्याला बघून कोणालाही भीती वाटावी अगदी असाच होता तो.


पण त्याचे डोळे बंदच होते त्याने मला बघीतलच नव्हतं मी तिथून पळूनच चालले होते.

तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला.


थांब; तो म्हणाला.

मी अगदी घाबरत घाबरतच मागे वळून पाहिलं.

कोण तु; तो म्हणाला त्याने मला विचारलं..

पण मी मात्र शांतच होते , भीतीने थरथर कापत होते 

मग त्याने मला पुन्हा विचारलं.

शेवटी नाईलाजाने मी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला.

हे ऐकून तो बाहेर निघून गेला ‌

थोड्या वेळात 

तो परत आला.

घे खाऊन घे तुला भूक लागली असेल ना; तो म्हणाला 

मला खरंच खूप भूक लागली होती ती फळं खाऊन मी तृप्त झाले.

मला घरी जायचंय; मी म्हणाले.

कुठे आहे तुझं घर 🏡 ; तो म्हणाला.

तेच तर मला आठवत नाही; मी म्हणाले.

थोड्या वेळात 

आम्ही दोघंही गुहेच्या बाहेर आलो.

आम्ही थोड्यावेळ असंच चालत होतो.

काही वेळाने.


तो मला सांगू लागला 


मी एक साधू आहे , मी खूप दिवस झाले त्या गुहेतच,राहतोय आणि तप करतोय देवाचं नाव घेतोय 
मला लहानपणापासूनच देवाला भेटायचं होतं म्हणून मी तेव्हाच घरातून पळून गेलो असाच एका गावात गेलो तिथल्या एका बाईने मला तिच्या घरात आश्रय दिला ती बाई खूप दयाळू होती पण गावकऱ्यांनी मला दरोडेखोर समजून रात्री  तिथ आणून टाकलं तेव्हा मी झोपत होतो जनावरां पासून वाचण्यासाठी मी त्या गुहेत शिरलो आणि तपश्चर्या करू लागलो ; तो सांगत होता.


तेवढ्यात जंगलात खूप पाऊस सुरू झाला.

पावसात भिजून तो साधू खूपच आजारी पडला म्हणून आम्हाला पुढे जाता आलं नाही.

आम्ही एका झाडाखाली थांबलो होतो.

काही दिवसांनी.

आता त्याला बरं वाटतं होतं मग पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झाला.


आम्ही एका गावात गेलो योगायोगाने तिथंच माझं घर 🏡 होतं.

मला बघून माझ्या आईला खूप आनंद झाला मी तिला सगळ सांगून टाकलं तिनं आम्हाला घरात घेतलं.


दोन चार दिवस असेच गेले.


मी आणि माझ्या आईने त्या साधूचा खूप छान पाहुणचार केला आम्ही त्याला मस्त खाऊ पिऊ घातलं.

त्याला खूप आनंद झाला 

काही दिवसांनी.

मला तुझ्याशी बोलायचंय: तो म्हणाला.


हो बोला; मी म्हणाले 

लग्न करशील माझ्याशी; तो म्हणाला
.

हे ऐकून मला खूपच मोठा धक्का बसला, मला खूप आश्चर्य वाटलं.

काही दिवस मी विचार केला.


काही दिवसांनी.

मी लग्नाला होकार दिला मग  आमचं लग्न खूप थाटामाटात झालं आणि मग आम्ही दोघं जोडीने तपश्चर्या करायला हिमालयात निघून गेलो ‌.




✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

रूसलेली मैत्रीण