माझं स्वयंवर

आमच्या राजवाड्यात चांगलीच लगबग सुरू झाली होती तिथं खूप गर्दी जमली होती.

मी खूप आनंदात होते.


आज मी किती नटले होते,सजले होते हे काही सांगायलाच नको.

सगळेजण आनंदात होते सगळेच बाहेर बसून खूप आतुरतेने माझी वाट पाहत होते जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा सगळेच टक लावून फक्त माझ्याकडेच पहात होते.


पण तिथं गेल्यावर मी खूप गडबडून गेले कारण तिथं खूप गर्दी होती देशोदेशीचे रामकुमार माझा नवरा होण्यासाठी एकाच रांगेत बसले होते मला आपलीं बायको बनवायला सगळेच आतूर झाले होते.

आणि थोड्यावेळातच कार्यक्रम सुरू झाला.


एक एक राजकुमार पुढे येत होता.

सगळेच राजकुमार एकदम हुशार, तल्लख बुद्धीचे, रूपवान होते कोणालाच नाव ठेवायला जागाच नव्हती.

मला सगळेच राजकुमार आवडले होते पण तरीही मी खूप बावरून गेले होते मला काहीच कळत नव्हतं.

अचानक आमच्या दारात गोंधळ सुरू झाला.

मला आत जाता येईल का,. कोणीतरी विचारलं.


थोड्यावेळाने तो आला.


तो कोण आहे हे मला माहीत नव्हतं पण  मी त्याला कुठेतरी पाहिलंय असं मला वाटत होतं.

काही दिवसांपूर्वी  मी त्याला TV  वर बघितलं होतं पण मला ते आठवत नव्हत


एक माणूस आत आला.

अहो युवराज तुम्ही इथं काय करताय,. तो माणूस म्हणाला.


कोण आहेत हे,. मी म्हणाले.


अहो हेच तर राजनगरीचे राजकुमार आहेत,. तो माणूस म्हणाला.

हे नाव ऐकून मी चकित झाले राजनगर नगरी ही सगळ्यात श्रीमंत नगरी होती  तिथला राजकुमार खूप कर्तृत्ववान आहे असं मी ऐकलं होतं.

मी सगळ्या राजकुमारांना जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न मी त्याला सुध्दा विचारले त्याने सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तर दिली.

शेवटी मी त्याला फक्त एकच प्रश्न विचारला.

प्रश्न - मी दुःखात असेल तर मला साथ देशील ना.

त्याने दिलेल उत्तर - नाही मी तुला दुःखात साथ देणार नाही कारण मी तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येऊच देणार नाही काळजी करू नकोस मी कायम तुझ्या सोबत आहे.

त्याच हे खूप सुंदर उत्तर ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या.


मी एकही क्षण वाया न घालवता त्याच्या गळ्यात वरमाला घातली.

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

रूसलेली मैत्रीण