आजोबांचा चष्मा
आता आजोबांचं वय झालं होतं तरीही ते अजून चांगले ठणठणीत होते.चांगले हिंडत फिरत होते.
आज त्यांचा 90 वा वाढदिवस होता सगळं घरं सजल होतं आज घरात पार्टी होती आजोबांनी मस्त केक कापला.
आणि दुसऱ्या दिवशी.
आजोबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले मोठा आवाज झाला सगळेजण धावत आले आणि आजोबांना डॉक्टर कडे घेऊन गेले.
यांची नजर कमी झाली आहे यांना चष्मा 👓 लागलाय ; डॉक्टर म्हणाले.
घरी आल्यावर आजोबा रूसून बसले.
काय झालंय बाबांना; सूनने विचारलं.
त्यांच्या मुलानी सारी हकीकत सांगितली.
आजोबांचे पणजोबा, आजोबा , वडील यांनी मरेपर्यंत चष्मा लावला नव्हता. त्यांच्या घरात कधीच कोणाला चष्मा लागला नव्हता त्यामुळे त्यांनाही चष्मा लावायचा नव्हता.
अरे तो डॉक्टर खोटारडा आहे उगाच लोकांना फसवायचे धंदे करतोय अरे आपल्या आख्ख्या खानदानात कोणालाच कधीच चष्मा लागला नाही आणि मी पण माझ्या उभ्या जन्मात माझ्या डोळ्यांवर चष्मा 👓 लावणार नाही संपला विषय; आजोबा रागारागाने बोलत होते.
आजोबांच्या शब्दा बाहेर जाण्याची कोणाचीच हिंमत नव्हती त्यामुळे तो विषय तिथेच संपला.
आणि एक दिवस अचानक
आजोबा सोन्याच्या दुकानात जाऊन सोन्याचा चष्मा घेऊन घरी आले.
आता आजोबा चष्मा घालून मस्त हिंडत फिरत होते सगळीकडे आनंदाने मिरवत होते.
एक दिवस अचानक ते रस्त्याने चालत असताना त्यांचा सोनेरी चष्मा चोरीला गेला त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण व्यार्थ.
आजोबा पोलिस ठाण्यात गेले.
हां बोला आजोबा काय तक्रार आहे तुमची'? पोलिस म्हणाले.
माझा चष्मा हरवलाय; आजोबा म्हणाले.
अहो मग नवीन घ्या ना; पोलिस म्हणाले.
अहो माझा सोनेरी चष्मा हरवलाय; आजोबा म्हणाले.
काय; पोलिस आश्चर्य चकित होऊन म्हणाले.
आणि मग चष्म्याचा शोध सुरू झाला पण काही केल्या आजोबांचा चष्मा सापडेना.
आणि मग शेवटी एक दिवस.
त्यांच्या मुलाने कबुली दिली.
कि मीच पैसे देऊन बाबाचा चष्मा चोरी करायला लावलाय; तो सांगत होता.
अहो पण का?'' पोलिस म्हणाले.
सांगतो ऐका; त्यांचा मुलगा म्हणाला.
आपल्या परिसरात चोरी आणि खून यांच प्रमाण खूप वाढलंय म्हणून बाबांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून मी एका माणसाला पैसे देऊन बाबांचा चष्मा 👓 चोरी करायला लावलाय आणि त्याने तो सोनेरी चष्मा 👓 माझ्याकडे आणून दिलाय;तो सांगत होता
पण तुम्हाला अटक तर करावीच लागेल; पोलिस म्हणाले
नको नको साहेब थांबा त्यानें त्याची चुक कबूल केली आहे ना त्याने
जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलंय ना ; आजोबा म्हणाले.
ठिक आहे; पोलिस म्हणाले.
पोलिस निघून गेले.
पण बाबा तुम्ही सोनेरी चष्मा कशाला बनवलाय?' त्यांच्या सुनेने प्रश्न विचारला.
अग काय सांगू तुला; आजोबा सांगू लागले.
त्या दिवशी मी पेपर वाचत बसलो होतो ना तेव्हा मी एक बातमी वाचली की सोन्याचे भाव कमी झाले आहेत म्हणून मी विचार केला की सोनेरी चष्मा 👓 घालून मला मस्त मिरवता येईल म्हणून मी सोनेरी चष्मा घेऊन घरी आलो: आजोबा सांगत होते.
आता मी आयुष्यात कधीच चष्मा घालणार नाही ; आजोबा रागारागाने बोलत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी
पण दुसऱ्या दिवशी त्यांना काहीच दिसेना
आणि मग तेव्हा मात्र त्यांनी एक साधा चष्मा वापरायला सुरुवात केली.
,✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा