सुटलेला हात

ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

आता त्यांची love story  कशी सुरु झाली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ?.

ती कॉलेज मध्ये नवीनच आली होती तो तिला पाहताच क्षणी तीच्या प्रेमात पडला अशाप्रकारे त्यांची लवस्टोरी सुरू झाली.

काही दिवस सगळं छान चाललं होतं पण नंतर त्यांच breakup  झालं आणि सगळं संपलं.

दोन वर्षांनंतर

तीचा अपघात झाला आणि ती खूप गंभीर जखमी झाली डॉक्टरांनी हात टेकले.

आता तीला कळून चुकलं की आता मी काही जगणार नाही पण ती काय करणार होती आता कोणाच्या हातात काहीच उरलं नव्हतं.

तीला त्याच्या आठवणी सतावत होत्या त्याला फोन करावा की नाही याच विचारात ती तळमळत बेडवर पडून होती.

शेवटी तीने त्याला फोन केलाच नाही.


आणि अखेर शेवटी तो दिवस उजाडला आज तीची प्राणज्योत मालवणार होती पण तीला इतक्यात प्राण सोडायचा नव्हता.

कोण जाणे कशी पण त्याला ही बातमी कळली तो अगदी धावतच हॉस्पिटलमध्ये गेला.

त्याने एक नजर तीच्याकडे पाहिलं ती खूपच अशक्त झाली होती तीचा प्राण तीच्या देहातून कधीही निघून जाईल की काय असं वाटतं होतं तो तीच्याकडे पाहून हसला पण त्याच्याकडे पाहून हसण्या इतकाही जीव तीच्या अंगात नव्हता.

तो हळूच तीच्या जवळ गेला आणि अगदी हळूवारपणे खूप प्रेमाने त्याने तीच्या केसातून हात फिरवला आता मात्र त्या दोघांचेही डोळे पाणावले होते.

त्याने अगदी अलगद तीचा हात आपल्या हातात घेतला.

हे सगळं मला आधीच का नाही सांगितलं; तो म्हणाला.

तीला त्याच्याशी खूप बोलायचं होतं पण तीला बोलता येत नव्हतं पण तरीही ती कशीबशी बोलली.

मी तुला फोन करून हे सगळं सांगणारच होते पण; 
तीला पुढे काहीच बोलवेना तीचे अश्रुच फक्त बोलत होते 

तोही निशब्द झाला होता त्यालाही काय बोलावं तेच कळत नव्हतं ‌‌त्याच्याही मनात खूप दुःख होत वेदना होत्या पण तो  त्या व्यक्त करू शकत नव्हता.

तीने त्याचा हात हातात घेतला.
 
एक ऐकशील माझं: ती अडखळत म्हणाली.

हो बोल ना; तो म्हणाला.

मला फक्त एकदा शेवटच तुझ्या मिठीत घेशील; ती म्हणाली.

त्याने भरल्या डोळ्यांनीच होकार दिला.

आणि मग ती अगदी हळूच अलगद त्याच्या मिठीत विसावली
आणि मग आनंदात निघून गेली कायमची.

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण