रोग

मी नुकताच दहावी पास झालो होतो आता तुम्ही मला हे विचारू नका की किती मार्क पडले ते सांगण्याची गरज मला वाटतं नाही तसं बघायला गेलं तर मी अभ्यासात हुशार आहे पण आणि नाही पण जाऊदे ते सोडा मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगतोय ना ते ऐका.ना.

तर काय सांगत होतो मी की मी दहावी पास झालो होतो आणि  कॉलेजला जाण्याची स्वप्नं पाहत होतो मला रोज नवनवीन स्वप्न पडत होती कित्येकदा ती स्वप्नं बघत मी दिवसभर बेडवर पडून असायचो.

कॉलेज मध्ये गेल्यावर प्रेमात तर पडायचंच असं मी मनातल्या मनात ठरवूनच टाकलं होतं.

शेवटी एक दिवस तो दिवस उजाडला त्या दिवशी मी माझ्या कॉलेज मध्ये पहिलं पाऊल टाकलं आज मी खूप आनंदात होतो मला सगळं  कसं अगदी नवीनच वाटत होतं.

काही दिवसांनी

आता कॉलेज मध्ये येऊन मला बरेच दिवस झाले होते नवीन आणि चांगले मित्र पण भेटले होते मैत्रीणीही भेटल्या होत्या.

पण मी मात्र तिला शोधत होतो.

ती माझी सोनपरी, माझ्या स्वप्नातली सुंदरी, माझ्या स्वप्नातली राजकुमारी माझ्या मनात तिचं चित्र तयारच होत पण ती अजूनही माझ्या समोर आली नव्हती मी तिची खूप आतुरतेने वाट बघत होतो.


कोण जाणे कधी येईल ती?'

पण एक दिवस देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्या दिवशी अचानक माझ्या ध्यानी मनीही नसताना ती माझ्या समोर आली.

मी तिचं रूप सौंदर्य बघून अगदी पुरता वेडा झालो.

ती अभ्यासात खूप हुशार होती पण ती माझ्या पासून खूप लांबच्या बेंचवर बसायची मग मी पण तिच्या ओढीने माझी जागा बदलली मला रोज तिच्याकडे चोरून चोरून बघता 
यावं फक्त हाच माझा आपला साधा सरळ हेतू होता हीच माझी इच्छा होती

आणि मग मला एक स्वप्न. पडलं की आमचं लग्न झालंय व मी तिला घास भरतोय ती हसत हसत लाजून माझ्याकडे बघत आहे
मी तिच्याकडे बायकोच्या नजरेने बघत होतो तेवढ्यात आमचे सर माझ्या समोर येऊन उभे राहिले मला त्यांचा ओरडा खावा लागला पण एवढं सगळं होऊनही तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं.
 
पण तिच्या समोर जाऊन तिच्याशी दोन चार शब्द बोलण्याची
काही माझ्यात हिंमत नव्हती.
 
तसा मी माझ्या मैत्रिणीं बरोबर बोलताना लाजत नव्हतो पण तिच्याशी बोलताना मात्र माझे शब्द माझ्या ओठांवरच थांबायचे मी खूप बावरून जायचो मला काय आणि कसं बोलावं तेच कळत नव्हतं.

मला दिवसरात्र फक्त तिचीच आठवण येत असे मला फक्त तिचीच स्वप्न पडत होती मी तिच्या प्रेमात मरून गेलो होतो.

अशी माझी प्रेमात लय बेकार अवस्था झाली होती लोक मला प्रेम वेडा,पागल दिवाना म्हणत होते.समजत होते आणि चिडवत सुध्दा होते.


मग मी विचार केला की आता खूप झालं विचार करणं आता नुकतंच स्वप्न बघून काही होणार नाही आता काहीतरी केलंच पाहिजे


मी पुर्णपणे तयारीतच होतो.

मी तिला प्रपोज केलं पण तिनं मला सगळ्या कॉलेज समोर एक जोरात कानाखाली मारली मी काहीवेळ पुर्णपणे सुन्न झालो, बधीर झालो सगळ्या कॉलेज मध्ये माझी इज्जत गेली.

तिनं मला कानाखाली मारली ना त्याचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. 

अरेच्या हे सगळं तर एक स्वप्न होतं अरे बापरे किती काय भयंकर भयानक स्वप्न पडलं मला; मी मलाच म्हणालो.

हे स्वप्न खरं होऊ शकत याची मला चांगलीच जाणीव झाली होती पण ते खरं होऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना केली.

मी आज जरा भीतभीतच कॉलेजला गेलो तिच्याशी बोलताना जरा जपूनच बोलायचं अस मी ठरवलं होतं.

शेवटी मी धाडस करुन तिच्याशी बोललोच.

अग जरा ऐक ना; मी म्हणालो.

हो बोल ना; ती म्हणाली.

अग खूप दिवसांपासून मला तुला एक सांगायचं होतं; मी म्हणालो.

काय?'अरे हो मग बोल ना;ती म्हणाली.

नको नको राहू दे भीती वाटते; मी आपलं सहजच बोलून गेलो.

माझ्या या बोलण्यावर ती खूप गोड हसली आणि ते पाहून मी तिच्यावर जरा जास्तच फीदा झालो.

अरे चल आता बोल पटकन काय बोलायचय ते ; ती हसूनच म्हणाली.

ते मी ते मी मी बोलताना अडखळत होतो आणि ती माझ्याकडे बघून फक्त हसत होती.

शेवटी माझ्यात असलेलं नसलेलं सगळं बळ एकवटून मी तिला म्हणालो की.

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे लग्न करशील माझ्याशी;

माझं हे वाक्य ऐकून ती अवाकच झाली. आणि थोडावेळ विचार करून अगदी शांतपणे म्हणाली.

हे बघ आपण दोघं एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो पण sorry मी हे लग्न  करू शकत नाही कारण मी असं ठरवलंय की माझे आईवडील मला ज्या मुलाशी लग्न करायला सांगतील ना मी त्याच मुलाशी लग्न करेन आणि तु मला माझ्या भावा सारखा आहेस;

ती अजूनही खूप शांतपणे बोलत होती


माझा चेहरा मात्र पडला होता माझी सगळी स्वप्नं संपली,भंगली होती मी रडाव म्हटलं तर मला धड रडता पण येतं नव्हतं

पण मी काय म्हणतोय ना की  मित्रांनो या मुलींना आपल्या मित्रांना भाऊ मानायचा जो काही रोग झालायं ना तो रोग कधी बरा होणार ना ते काय कळतंच नाय

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड.

 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण