मोगरा







तो शाळेतला  सर्वात हुशार विद्यार्थी होता त्याचा नेहमीच शाळेत पहिला नंबर येत असे त्याच्या शिक्षकांना त्याच खूप कौतुक वाटायचं.

आता त्याची परिक्षा जवळ आली होती त्यावेळीही त्याचा परिक्षेत पहिला नंबर आला आणि तो पुढच्या वर्गात गेला.

पुढच्या वर्गात गेल्यावरही त्याचा तोच  क्रम सूरू होता त्या वर्गात सुध्दा त्याने सगळ्यांची मन जिंकली होती तो सगळ्यांचा लाडका झाला होता.

काही दिवसांनी

त्याच्या वर्गात एक नवीन मुलगी आली तिला पाहताच क्षणी त्याला ती खूप आवडली.

तीही त्याच्या सारखीच हुशार कदाचित त्याच्यापेक्षा जास्त हुशार होती ती त्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली आतापर्यंत फक्त तोच शाळेत पहिला येत होता पण आता तिच्यामुळे तो काहीसा मागे पडला आणि ती त्याच्या पुढे निघून गेली पण तरीही त्याला तिच खूपच कौतुक वाटायचं.

शाळा संपली दहावीत असताना शाळेत तिचाच पहिला नंबर आला.

त्याला तिची खूप आठवण येत होती पण आता शाळा संपली होती त्यामुळे त्याला तिला पाहताच येईना तो तिला विसरण्याचा प्रयत्न करत होता.

त्याच कॉलेज सुरू झालं कॉलेज मध्ये पण तीच परिस्थिती तो कॉलेज मधला सगळ्यांत हुशार विद्यार्थी
अगदी मनमोकळा, दीलखूलास. मनमिळाऊ. मुलगा होता सगळ्यांची जान , कॉलेजची जान आणि शान कॉलेज मधल्या सगळ्या पोरी त्याच्यावर फिदा होत्या.

त्याची एक best friend होती आज ते दोघं कॅन्टीन मध्ये बसून बोलत होते.

माझी एक मैत्रीण आहे ती आपल्या कॉलेज मध्ये येणार आहे शिकायला;  ती म्हणाली.

हो मग येऊ दे की ती हुशार आहे का?'  तो म्हणाला.

हो आहे पण तुझ्यापेक्षा हुशार नाही ती;  ती म्हणाली.

हो बघू; ;तो हसत हसत म्हणाला.

काही दिवसांनी

काही दिवसांनी ती कॉलेज मध्ये आली.

त्याला आठवलं की ही तीच आहे आणि त्याला खूप आनंद झाला होता त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या कॉलेज मध्ये सुध्दा तो तिच्यामुळे मागे पडला.

एक दिवस तो हिंमत करून तिच्याशी बोलाला.

हाय ओळखलं मला; तो म्हणाला.

नाही; ती म्हणाली.

अग आपण दोघं एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो; तो म्हणाला.

हो का ओके ओके; ती म्हणाली.

काही दिवसांनी एक दिवस


त्या दिवशी कॉलेज मध्ये कार्यक्रम होता ती मस्त नटून थटून  कॉलेजला आली होती साडीत ती एकच नंबर दिसत होती लय भारी, एकदम कडक.

तो तिला बघून वेडाच झाला.


आज तिला प्रपोज करायचंच अस त्याने ठरवलं तो धीर करून तिच्या समोर गेला.

अग ऐक ना; तो म्हणाला.

काय रे बोल ना; ती म्हणाली.

अग आज तु खुप सुंदर दिसतेस;तो म्हणाला.

Thank you; ती म्हणाली.

लग्न करशील माझ्याशी; तो म्हणाला.

हो; ती लाजत लाजत म्हणाली.

त्यांच लग्न अगदी थाटामाटात पार पडलं.

काही दिवसांनी

तिच्या कारचा अपघात झाला.


ती सगळ विसरली म्हणजे अगदी त्याला सुध्दा विसरली डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही..


तो हताश झाला होता काय करावं त्याला काहीच कळेना.


शेवटी एक दिवस

त्याने तिच्यासाठी गजरा आणला त्याचा सुगंध तिच्या श्वासात दरवळला आणि चमत्कार झाला.

तिला सगळ काही आठवलं तिला आठवलं की कॉलेज मध्ये असताना त्याने हाच मोगऱ्याचा गजरा तिच्या केसात माळला होता आणि तिला प्रपोज केलं होत.

आणि मग त्याने पुन्हा एकदा आनंदात तो मोगऱ्याचा गजरा तिच्या केसात माळला.



आज त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार असलेला मोगराच त्यांच्या मदतीला धावून आला होता.


आपण एखाद्या माणसाला विसरून गेलो ना तरी आपण त्या माणसा सोबत घालवलेले ते गोड गोड क्षण आणि त्या गोड गोड आठवणी आपल्याला विसरता येत नाहीत हेच खरं

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

तपश्चर्या

रूसलेली मैत्रीण