गोष्ट एका रेडिओ ची

माझी आज्जी माझ्या लहानपणीच गेली मला तिचा चेहरा सुध्दा आठवत नाही पण माझे आजोबा मला माझ्या आज्जीच्या गोष्टी सांगायचे.

आज्जीच्या आजारपणात त्यांनी तिची खूप सेवा केली असं म्हणतात की पुरुषांना रडता येत नाही पण आज्जी गेली तेव्हा आजोबा खूप मनापासून रडले होते.


त्यांची माझ्याशी चांगलीच गट्टी जमली होती ते मला त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायचे.

अग आज मला तुझ्या आज्जीची खूप आठवण येते ; ते म्हणाले.

का काय झालं; मी म्हणाले.

अग आजारपणात जोडीदाराची आठवण येते ग बाळा; ते म्हणाले.

ओके ओके; मी म्हणाले.

अग आतून माझा रेडिओ घेऊन ये ग मी माळ्यावर ठेवला असेल बघ मी मस्त गाणी ऐकत बसतो म्हणजे मला जरा बरं वाटेल;  ते म्हणाले.

आजोबा रेडिओ नाहीये घरात  माळ्यावर बघीतलं सगळीकडे बघीतलं कुठेच नाही तुमचा रेडिओ ; मी म्हणाले.

काही वेळाने

सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा घरात शोधाशोध केली पण रेडिओ कुठेच सापडेना.

आजोबा उदास होऊन त्यांच्या खोलीत येऊन बसले.आणि मी त्यांच्या जवळ जाऊन बसले त्यांनी मला सांगायला सुरुवात केली,.ते सांगू लागले.

हा रेडीओ मी माझ्या पहिल्या कमाईतून विकत घेतला होता मी त्याच नाव चूलबुल्या रेडिओ असं ठेवलं होतं कारण  त्यावर चुलबुली खबरे सुनिये हा कार्यक्रम लागायचा आणि तो कार्यक्रम मी ऐकायचो.


पुढे मला रेडीओ वरची गाणी ऐकण्याचा छंद लागला मग मी त्याच नाव बदलून सूरेला रेडिओ असं ठेवलं जसे जसे रेडिओ वरचे कार्यक्रम बदलत गेले ना तशी मी त्याला वेगवेगळी नावं ठेवत गेलो आता त्यातली फारशी नावं मला आठवत पण नाहीत.

काही दिवसांनी कामावर जाताना सुध्दा  मी त्याला माझ्या सोबत घेऊन जात होतो मी मस्त गाणी ऐकत ऐकत काम  करायचो.
 त्यामुळे मला कामाचा थकवा कधीच जाणवला नाही आणि त्याच्या मुळेच माझ्या हातातली कामं लवकर संपायची.

मी तुला एक प्रसंग सांगतो; ते म्हणाले.

सांगा; मी म्हणाले.


एक दिवस माझ माझ्या मित्राशी कडाक्याच भांडण झालं  मग मी तसाच रागा रागात घरी निघून आलो

काही दिवसांनी.

चार पाच दिवसांनंतर रेडिओ वर शोले पिक्चर मधलं एक गाणं लागलं होतं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं ऐकून मला रडू आलं मी धावतच जाऊन त्याला बिलगलो आणि आमचं भांडण मिटलं.


आता माझं लग्नाचं वय झालं होतं घरच्यांनी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली मी पन्नास पोरी बघीतल्या तेव्हा कुठे पुढं जाऊन तुझी आज्जी मला सापडली;
त्यांच्या या बोलण्यावर मी अगदी खळखळून हसले आणि तेही हसले.

मी इतका रेडिओ वेडा होतो ना की तुझ्या आज्जीला बघायला जातानाही मी माझ्या बरोबर रेडिओ घेऊन गेलो होतो.

मी तिला फक्त एकच प्रश्न विचारला की.

तुम्ही मला पसंत आहात पण तुम्हाला रेडिओ वरची गाणी ऐकायची आवड आहे का?'

ती हो ;म्हणाली.

आणि मग तिथंच आमचे सूर जुळले ;

त्याकाळी रेडिओ वर जी romantic गाणी लागायची ना त्या गाण्यात आम्ही दोघं स्वताला बघायचो आणि मनातल्या मनात हसायचो एकमेकांना आठवून आठवून लाजायचो तेवढाच काय तो आमचा लग्ना आधीचा रोमान्स आजोबा गालातल्या गालात हसले.



पुढे आमचं लग्न झालं आणि मग आमचा संगीतमय संसार सुरू झाला.


आमच पहिलं भांडण झालं  ना तेव्हा हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना अबोला हे गाणं मी माझ्या बेसूऱ्या आवाजात  तिच्यासाठी गायलं होतं आणि तिला  पटवली होती त्यावर ती खट्याळ हसली होती मी तिच्यासाठी गायक सुध्दा झालो होतो.

तुझा बाप जन्माला आला ना तेव्हा मी हॉस्पिटलच्या आवारात बसून आएगा फिर से बचपन हमारा हेच गाणं  म्हणत होतो आणि तुझी आज्जी पण मनातल्या मनात हेच गाणं गुणगुणत होती तुझा बाप,काका, आणि आत्या आमची तिन्ही पोरं याच गाण्यावर जन्मली आहेत आणि आमचं बालपण आमच्याकडे परत आलंय.

तुझी आज्जी हॉस्पिटलमध्ये असताना ती तिचे शेवटचे श्वास मोजत होती ना तेव्हा हीच गाणी ऐकवूनच मी तिला आनंदात ठेवत होतो आणि तिच्या शेवटच्या क्षणीही हीच गाणी ऐकत ऐकतच ती सुखात, आनंदात वर गेली.

माझ्या आजोबांकडे सुध्दा एक असाच  रेडिओ होता तो रेडिओ त्यांनी मला भेट म्हणून दिला होता पण काही दिवसांनी तो रेडिओ बिघडला मी त्याला दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

शेवटी मी माझ्या पहिल्या कमाईतून हा रेडिओ विकत घेतला  होता हा रेडिओ मला माझ्या जीवा पेक्षा जास्त प्रिय आहे.

आमच्या काळात आता सारखे TV, मोबाईल, स्मार्टफोन अशी काही भानगड नव्हती त्याकाळी तशी काही सोय नव्हती हा रेडिओच आमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला आमच्या सोबत असायचा तोच आमचा सखा, सोबती, साथीदार होता.


हे  सगळं सांगताना आजोबा खूप हळवे झाले होते.


आजोबांच आजारपण वाढतच चाललं होतं आता मला त्यांची ही अवस्था पाहवत नव्हती मग मी खूप धडपड करून त्यांचा रेडिओ शोधून काढला आणि त्यांना आणून दिला

त्यांना खूप आनंद झाला ते अगदी ठणठणीत बरे झाले.

आणि मग काही दिवसांनी

त्यांनी माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि मग ते मला म्हणाले.

आता हा रेडिओ मी तुला देतो आता इथून पुढे तुच सांभाळ आपली संगीतमय परंपरा ;

मी अजूनही आमची संगीतमय परंपरा पुढे चालवत आहे मी अजूनही तो रेडिओ जपून ठेवलाय.

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण