दुधावरची साय

तसं माझं बालपण खेड्यतच गेलं आम्हाला शाळेत जाण्यासाठी नदी पार करून पलीकडे जाव लागत होतं कारण आमच्या शाळेत जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता मग पुढे मी पुढील शिक्षणासाठी शहरात आलो.

आता खरी गोष्ट सांगतो.


आमच्या गावात एक म्हातारी राहात होती ती आमच्या शेजारीच राहत होती त्यामुळे तिची आणि आमची चांगलीच ओळख पाळख झाली होती.

पण मला मात्र म्हतारीला बघून खूप वाईट वाटायचं कारण तिचं या जगात कोणीच नव्हतं ती तिच्या घरात एकटीच राहायची.


आणि हे सगळं बघून मला खूप वाईट वाटायचं पण तिला काही विचारलं तर तिला काहीच आठवत नसे बहुतेक एका मागोमाग एक असे मानसिक धक्के बसल्यामुळे असं होतं असेल कदाचित म्हणजे मला असं वाटतंय.

पण असं असलं तरी तरी तिनं सगळं गाव दत्तक घेतलं होतं साऱ्या गावाची आई झाली होती ती.

आणि सगळा गाव तिचं लेकरू होऊन तिची काळजी घेत होता.

एकदा मी रडत रडतच तिच्या घरी गेलो.

काय र रडायला काय झालं ; ती म्हणाली.

मला मास्तरांनी मारलं ; मी म्हणालो.

तिनं मला जवळ घेतलं आणि तिच्या पदराने माझे डोळे पुसले मला तेव्हा खूप छान वाटलं.

उद्या तु माझ्या बरोबर माझ्या शाळेत येशील ?' मी तिला प्रश्न विचारला.

का र काय झालं ?' ती म्हणाली.

काय नाय असंच ; मी म्हणालो.

बरं बरं येते मी उद्या तुझ्याबरोबर तुझ्या शाळेत आता घरी जा बघू लवकर ; ती म्हणाली.

आणि मग मी आनंदाने नाचत नाचत आमच्या घरी गेलो.

आणि दुसऱ्या दिवशी.

ती माझ्या बरोबर माझ्या शाळेत आली .

आमचे मास्तर फार कडक शिस्तीचे होते मी वर्गात शिरणार होतो तोच   ते मला ओरडले

थांब तिथंच अजिबात आत येऊ नकोस;, ते म्हणाले.

आमचे मास्तर आताच शहरातुन शिकून गावात नवीन आले होते त्यामुळे ते शहरी भाषा बोलायचे.

मग आमची म्हातारी पुढं आली. 

काय केलंय ओ माझ्या पोरान; ती म्हणाली.

नमस्कार आज्जी ; मास्तर म्हणाले.

हा नमस्कार नमस्कार पुढं काय ते बोला; ती म्हणाली.

हा तुमचा नातु का?' मास्तर म्हणाले

होय ; ती म्हणाली.

तुमचा नातु वर्गात खूप दंगा मस्ती करतो त्याच अभ्यासात अजिबात लक्ष नाही त्या दिवशी मी काही कामानिमित्त थोडावेळ वर्गाबाहेर गेलो होतो तेव्हा याने वर्गातल्या सगळ्या मुलांना बाहेर खेळायला मैदानावर नेलं होतं:  मास्तर सांगत होते.

जाऊद्या ओ मास्तर जे झालं ते झालं;; ती म्हणाली.
  
तिने त्यांची माफी मागितली ती त्यांच्या समोर खूप गयावया करत होती शेवटी त्यांनी मला वर्गात बसायची परवानगी दिली.

आईबाबांना काहीच न सांगता हे सगळं प्रकरण मिटल म्हणून मी खूप आनंदात होतो.

काही दिवसांनी

पुढे एक दिवस माझी आई खूप आजारी पडली काही केल्या आईला बरंच वाटेना पण मग काही दिवसांनी माझी आई ठणठणीत बरी झाली .

पण तोपर्यंत आमची खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आज्जी रोज आमच्या घरी येऊन स्वयंपाक करायची
कधीकधी मला शाळेत सोडायची मला खाऊला पैसे द्यायची आज्जीने  माझ्या आईची आई सारखीच सेवा केली
आई आज्जीच्या गळ्यात पडून खूप रडली.


कधी काळी आमच्यावर आमचं घरदार सोडून शेतीवाडी विकून  हे गाव सोडून जाण्याची वेळ आली होती कारण माझ्या बाबांना शेतीत खूप मोठं नुकसान झालं होतं त्यांच्या डोक्यावर सावकाराच भलंमोठं कर्ज झालं होतं
त्यावेळी या आज्जीनेच आम्हाला पैशाची थोडीफार मदत केली होती त्यामुळेच आमचं घरदार आणि शेत वाचलं होतं.

पुढे काही वर्षांनी आमची परिस्थिती सुधारल्यावर मी शिक्षणासाठी आणि कामा धंद्यासाठी शहरात आलो पण गावातून जाताना तिचा आशीर्वाद घ्यायचं राहून गेलं त्याची  हुरहूर अजूनही माझ्या मनाला लागून राहिली आहे.

आज मी खूप वर्षांनी  वकील होऊन गावी परतलो आहे आज गावात सगळीकडे मला खूप मान सन्मान मिळत आहे सगळ्या गावकऱ्यांना माझा अभिमान वाटतोय गवाने माझा जंगी सत्कार केला.

मी गावात विचारपूस केली ना तेव्हा मला काहीतरी माहिती मिळाली .

मी धावतच मंदिरात गेलो आज्जी तिथंच बसली होती.

आज्जी मला ओळखलं का?' मी तिच्या जवळ जाऊन प्रश्न विचारला.

या आज्जी कोणालाच ओळख नाहीत खूप दिवसांपासून या इथंच बसून आहेत; मंदिराचा पुजारी सांगत होता.

मग मी अगदी निराश होऊन खिन्न मनाने त्या मंदिरातून बाहेर पडणारच होतो तेवढ्यात मागून मला आवाज आला

थांब बाळा  ; आज्जी म्हणाली.

बहुतेक आज्जीने मला ओळखलं असावं मी तिच्या दिशेने धावलो.

आज्जीने मला घट्ट मीठी मारली तिला सगळ काही आठवत होतं पण ती काहीच बोलत नव्हती 

तिनं मला तिच्या हातातली लेमनची गोळी दिली जणू काही तिनं ती गोळी माझ्यासाठीच जपून ठेवली होती.

आज्जी  तु आता इथ नाय राहायचं; मी म्हणालो.

मग आता कुठं राहु मी  ;ती म्हणाली.

माझ्या घरी;  मी म्हणालो.



ती नको नकोच म्हणत होती पण मी तिचं काहीच ऐकलं नाही शेवटी माझ्या कार मध्ये बसून माझ्या घरी जाताना मला न राहवून मी तिला विचारलं की.

आज्जी तु माझे एवढे लाड  का करतेस ग ?' मी म्हणालो.

अर पोरा तु  म्हणजे माझी माझ्या दुधावरची साय हाय बघ;  आज्जी म्हणाली.


मग मी आज्जीला कडकडून मीठी मारली.

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 


 ्

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण