ओळख ना पाळख
मी किराणा मालाच्या दुकाना बाहेर उभा होतो तिथं खूप गर्दी होती दुकाना बाहेर लांबच्या लांब रांग होती मी गर्दीत उभा राहून राहून पार वैतागलो होतो.
मी कसाबसा सामान घेऊन घरी आलो.
काही दिवसांनी
त्या दिवशी एक माणूस तुमचा पाठलाग करत होता ;माझा शेजारी म्हणाला.
काय सांगता ; मी म्हणालो.
होय ; माझा शेजारी म्हणाला.
कोण होता तो माणूस?' मी म्हणालो.
ते काय माहीत नाय ; माझा शेजारी म्हणाला
मी विचारात पडलो की कोण असेल तो माणूस
काही दिवसांनी
चार पाच दिवसांनंतर मी असाच कुठेतरी गेलो होतो तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी दोन माणसांना माझा पाठलाग करताना पाहिलं.
तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली की हे चोर तर नसतील ना, हे मला लुटायला तर आले नसतील ना असे एक ना अनेक प्रश्न आणि विचार माझ्या मनात येऊन गेले.
मी त्यांच्यावर नजर ठेवून उभा होतो मी त्यांना बघताना कदाचित त्यांनी मला बघीतल असावं
ते दोघ लपून छपून माझ्याकडे बघत होते जपून जपून सावधगिरीने पावलं टाकत होते.
मग मी पण एक गंमत केली.
मी त्यांच्या नजरेसमोरून थोडा वेळ नाहीसा झालो तसे ते दोघे खूप घाबरले आणि मला शोधू लागले थोड्यावेळात मला शोधून शोधून थकले.
थोडावेळ मी पण लपून छपून त्यांची ही गंमत बघत होतो
नंतर मलाच त्यांची दया आली.
थोडावेळ असाच गेला.
काही वेळाने
मी तिथं जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तसं त्या दोघांनी दचकून मागे वळून माझ्याकडे बघीतल.
हा बोला काय काम आहे तुमचं माझ्याकडे ; मी म्हणालो.
तुमी माझयासंग लगीन कराल का?' ती मुलगी म्हणत होती.
तिच्या या बोलण्यावर मला हसूच आलं.
तिचा बाप माझ्यासमोर अगदी गयावया करत होता.
अहो बाबा मला दोन पोर आहेत आणि आता मीच माझ्या पोरी साठी पोरगा शोधतोय तुमच्या पाहण्यात माझ्या पोरी साठी एखादा चांगला पोरगा असेल तर आता तुम्हीच मला नक्की सांगा ; शेवटी मीच त्यांना म्हणालो.
माझं हे बोलणं ऐकून त्यांचा चेहरा पडला.
वयाच्या पन्नाशीत सुध्दा मी इतका तरूण दिसतोय की मला अजूनही लग्नासाठी मुली सांगून येतात आणि माझ्याशी लग्न करण्यासाठी माझा पाठलाग करतात हा विचार करून मला खूप आनंद झाला.
मी मस्त ऐटीत शायनिंग मारत रस्त्याने चालत होतो.
पण माझ्या बरोबर घडलेला हा प्रसंग आठवून आठवून माझ्या मनात फक्त एकच विचार येत होता की.
याला म्हणतात ओळख ना पाळख आणि मी तुझा मालक.
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा