गोष्ट आमच्या सरांची

मी शाळा, कॉलेज मध्ये होतो ना तेव्हाची ही गोष्ट म्हणजे मी कॉलेज मध्ये असतानाचीच गोष्ट आहे ही कारण आपण शाळेत असताना आपल्याला फारसं काही कळत नाही.

मी कॉलेज मध्ये असताना आम्हाला एक सर होते ते फार छान शिकवायचे ते आमच्या सगळ्यांचेच लाडके सर होते सर विद्यार्थ्यांच्या मध्ये लोकप्रिय होते प्रसिद्ध होते थोडक्यात सांगायच झाल तर सर विद्यार्थी मित्र होते..

सर खूप छान पण साधे  कपडे घालायचे नीटनेटके राहायचे आणि दिसायलाही ते तसे बरे होते.

त्यांचा स्वभाव तर खूपच चांगला होता ते खूप दयाळू आणि मायाळू होते कोणावर रागावणं, ओरडण हे तर त्यांना माहीतच नव्हतं ते सर्वांशी खूप प्रेमाने वागायचे.


पण एक दिवस कॉलेज सुटल्यावर घरी जात असताना आमचे  सर मला कॉलेजच्या कट्ट्यावर बसून रडताना दिसले हे पाहून मला धक्काच बसला पण त्यांना काय झालंय हे त्यांना विचारण्यासाठी मी पुढं गेलोच नाही कारण माझी पुढं जाण्याची हिंमतच होत नव्हती.

मी  घरी आल्यावर मी विचार करु लागलो की नेहमी हसत खेळत राहाणारे आमचे सर अचानक रडू कसं शकतात नेहमी हसत खेळत असलेला हा माणूस रडूच कसा शकतो.

दुसऱ्या दिवशी


दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला गेलो तर सर कॉलेज मध्ये आलेच नव्हते तसा मग मी पुन्हा विचारात पडलो.


काही दिवसांनी मला सर आजारी पडल्याची बातमी कळाली मी फोन करून त्यांची चौकशी केली.

एक दिवस असाच रस्त्याने जात असताना वाटेत सरांच्या घरी गेलो आणि  त्यांची भेट घेतली.

सर खरच खूप आजारी पडले होते ते मला खूप खचलेले आणि थकलेले वाटले.

त्यांना नक्की काय झालंय ते कोणालाच कळेना त्यांच्या रोगाचं नीट निदानच होईना.

सर कॉलेज मध्ये येत नव्हतेच त्यामुळे आम्हाला करमत नव्हत  आमचं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं त्या दिवशी सर रडत होते  हे मला अचानक आठवलं 

आम्ही सगळ्यांनी सरांची मदत करायचं ठरवलं आणि चौकशी केली

सरांची बायको आम्हाला सांगत होती.

तेव्हा सर आमच्या सारखेच विद्यार्थी होते अभ्यासात हुशार, चाणाक्ष त्यांच्या कॉलेज मध्ये त्यांचा दबदबा होता

त्या वयात सगळेच प्रेमात पडतात पण त्यांना प्रेमात पडायचं नव्हतं पण तरीही.

त्यांच्या आयुष्यात एक मुलगी आली त्यांना ती खूप आवडली त्या मुलीला सुध्दा सर खूप आवडायचे.

सरांनी तिला प्रपोज केलं असतं तर तिने नक्कीच होकार दिला असता.


त्या दिवशी तिचा वाढदिवस होता संर खूप आनंदात होते आज ते तिला प्रपोज करणार होते..

पण दुर्दैवाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिचा
 अपघात झाला आणि ती सरांना सोडून कायमची निघुन गेली.

सरांना खूप दुःख झालं  पण तरीही ते सावरले त्यातून बाहेर पडले 

त्यांच लग्न झाल सुखाचा संसार सुरू झाला


पण अजूनही सर तिच्या दर वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कॉलेज मध्ये जाऊन तिची वाट बघतात पण देवाघरी गेलेला माणूस  कधीच परत येत नाही


सरांनी इतकी वर्ष हे दुःख आपल्या मनातच दाबून ठेवल होत पण त्या दिवशी त्यांच्या मनातल्या भावनांचा विस्फोट झाला  आणि  ते खूप रडले त्यांना हे दुःख सहन करणं अशक्य आणि असह्य झाल होत म्हणूनच ते आजारी पडले होते.



हे  सगळं ऐकून आमचे डोळे पाणावले.


काही दिवसांनी


सर देवाघरी गेल्याची बातमी कळाली मी सहजच कॅलेंडर बघीतल तर  आज त्या मुलीचा वाढदिवस होता.


सरांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्राण सोडले.



म्हणून म्हणतोय प्रेम असो किंवा मैत्री वेळीच व्यक्त व्हायला शिका कारण कदाचित गेलीली वेळ परत येऊ शकते पण सोडून गेलेली व्यक्ती नाही.



कारण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला योग्य वेळेची गरज नसते तर आपण ज्या वेळी आपल्या भावना व्यक्त करतो ना तीच आपल्यासाठी योग्य वेळ असते.

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण