हे घर कोणाच
पण त्या घराचा मुळ मालक कोण याचा कोणालाच काहीच पत्ता नव्हता सगळे त्याला भूताचा वाडा म्हणायचे रात्री कोणी तिकडे फिरकत नसे.
कधी काळी तिथं कोणीतरी राहत होतं असं लोक म्हणतात .
असेच एका मागोमाग एक दिवस चालले होते.
काही दिवसांनी एक दिवस
मी असाच रस्त्याने जात होतो तेव्हा मला त्या घरा समोर गर्दी दिसली पण मी तिथून पळून आलो.
काही दिवसांनी मला ते घर विकायला काढल्याची बातमी कळाली रोज ते घर पाहण्यासाठी माणसं येत जात होती पण मला नेहमी असं वाटायचं की त्या मोडकळीस आलेल्या घरात कोणाला काय रस असणार ॽं
फण तस नव्हतं त्या घरात लोकांना जरा जास्तच रस होता.
त्या घराचा सौदा झाला ते विकल्या गेलं पण.
काही दिवसांनी
त्या घरा समोर पुन्हा माणसांची गर्दी झाली होती खूप गोंधळ उडाला होता.
हे घर माझं आहे मला पैसे द्या गर्दीतला प्रत्येक माणूस हेच बोलत होता गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर पैशाची हाव दिसत होती ती सगळी माणसं पैशांसाठी हपापली होती त्या घराचा खरा मालक कोण हा प्रश्न होता
खूप दिवस झाले तरी हा प्रश्न सुटेना.
शेवटी एक दिवस एक माणूस आमच्या गावात आला आणि मी या घराचा खरा मालक आहे असं म्हणू लागला.
आम्ही त्याची चौकशी केली तेव्हा तो सांगू लागला.
आम्ही सगळे शहरात राहतो हे घर माझ्या खापर पणजोबांच आहे त्यांचा खूप मोठा व्यापार होता ते या गावतले मोठं प्रस्थ होते त्यांनी व्यापारात खूप नाव कमावले.
पण सगळ्यांचेच दिवस बदलतात तसे त्यांचेही दिवस बदलले त्यांना कोणीतरी फसवले त्यांना धंद्यात खोट बसली त्यांच खूप नुकसान झालं ते हे गाव सोडून शहरात आले.
त्यांनी शहरात येऊन नवीन कामधंदा सुरू केला त्यांचा धंद्यात चांगला जम बसला
.
आता आमच्याकडे पैसा, घरदार सगळं काही होतं.
माझे खापर पणजोबा या गावात कधीच परतले नाहीत त्यांनी कोणालाच या घरा बद्दल काहीच सांगितलं नाही त्यामुळे आम्हाला काहीच माहित नव्हते.
पण एक दिवस मी जुनी कागदपत्र तपासत असताना मला ही माहिती मिळाली.
आमच्या गावात एक जुनी जाणती म्हातारी होती तिचं वय झालं होतं तिने त्या माणसाला ओळखलं कारण ती पिढ्यानुपिढ्या त्या कुटुंबाला ओळख होती
त्या माणसाने आम्हाला त्या घराची कागदपत्र सुध्दा दाखवली ती आम्हाला योग्य वाटली त्या घराच्या खऱ्या मालकाची खरी ओळख पटली.
शेवटी त्या घराला त्याचा खरा मालक मिळालाच.
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा