मी एक ढ विद्यार्थी
मी आमच्या वर्गातला सगळ्यात ढ विद्यार्थी होतो सगळे मला ढ म्हणून चिडवायचे मला वर्गात कोणीच किंमत देत नव्हतं .
तसा मी ढ नव्हतो पण माझ्याबद्दल सगळ्यांचा गैरसमज झाला होता.
काही दिवसांनी एक दिवस.
आमचे सर वर्गात आले तेव्हा कोणीतरी सरांची खोडी काढली त्यांनी विचारपूस केली
हा पेन मला कोणी फेकून मारला,. सर प्रश्न विचारत होते.
आमचे सर फार कडक शिस्तीचे होते त्यामुळे त्यांना घाबरून कोणी उत्तर देईना.
सर रागात रागात वर्गात चौफेर फिरले पण व्यर्थ
शेवटी वर्गातल्या एका मुलानं सरांना माझं नांव सांगितलं त्यामुळे सरांनी मला शिक्षा दिली .
मी आंगठे धरून उभा होतो.
अजून एक दिवस अशीच एक घटना घडली.
वर्गातल्या एका मुलाची वह्या पुस्तकं वर्गातून त्याच्या बॅगे सकट चोरीला गेली.
सरांना माझ्यावर संशय आला त्यांनी मला वर्गा बाहेर काढले.
काही दिवसांनी
वर्गातल्या सगळ्या मुलांचे डबे चोरीला गेले सरांनी मला खूप मारलं आणि वर्गा बाहेर काढले.
अजून काही दिवस अश्याच घटना घडत होत्या आता मी वर्गात कमी आणि वर्गाबाहेरच जास्त असायचो.
शेवटी मी पार वैतागून गेलो याचा माझ्या अभ्यासावर परिणाम झाला.
मी शोधाशोध केली , चौकशी केली.
आमच्या वर्गातला एक मुलगा मला पाण्यात पाहत होता कारण मी हुशार आहे हे त्याला माहीत होतं.
एक दिवस तो सरांची खोडी काढत असताना मी त्याला पाहिलं आणि मग मी त्याला रंगेहाथ पकडलं.
मी त्याला सरां समोर घेऊन गेलो.
आठ दिवसांसाठी सरांनी त्याला शाळेतून काढून टाकलं.
आज आमच्या परिक्षेचा निकाल होता यावेळी मी खूप मनापासून अभ्यास केला होता मला पेपर सुध्दा खूप छान गेले होते.
पण माझ्या मनात खूप धाकधूक होती मी खूप घाबरलो होतो.
आणि माझ्या परिक्षेचा माझा निकाल बघून मला धक्काच बसला.
मला खूप चांगले मार्क्स मिळाले होते मी शाळेत पहिला आलो होतो आमच्या शाळेत माझा सत्कार करण्यात आला आणि मला बक्षीस मिळालं.
त्या मुलानं माझी माफी मागितली मी त्याला माफ केलं मग आमच्यात चांगली मैत्री झाली.
शेवटी मी ढ नाही हे सगळ्यांना कळल आणि मी आमच्या वर्गात आणि शाळेत ताठ मानेने वावरू लागलो.
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा