कीर्तन
आज मी आयुष्यात पहिल्यांदाच कीर्तनाला गेलो म्हटलं बघू तरी बुवा कीर्तनात काय सांगतात ते तशी माझी बायको रोज कीर्तनाला जाते पण मी काही तिच्या सोबत जात नाही.
आज ती आजारी पडली म्हणून तिच्या ऐवजी मी कीर्तनाला गेलो.
पण काही केल्या माझं मन कीर्तनात रमेना तसा मी फारसा कधी देवळात सुध्दा जात नाही पण आज मला काय झालं काय कळत नाही.
थोडावेळ असाच गेला थोड्यावेळाने मला एका जागी बसून बसून कंटाळा आला बुवांच बोलणं ऐकता ऐकता मी पार वैतागून गेलो.
हळूहळू मी पेंगत होतो आणि माझ्याही नकळत मी बसल्या बसल्या झोपी गेलो.
काही तासांनंतर
अचानक कसला तरी आवाज झाला सगळेजण खूप घाबरले तरीही ते घाबरत घाबरत कीर्तन ऐकत होते ते बुवा सुध्दा न घाबरता आनंदाने, भक्तीभावाने कीर्तन सांगत होते.
काही वेळाने
तो आवाज आता जरा जास्तच वाढला होता मंदिरात कुजबुज सुरु झाली आता मात्र सगळेच खरंच खूप घाबरले होते ,डचकले होते.
आता बुवा पण हादरले होते त्यांनी देवाचा धावा सुरू केला त्यांच्या मागोमाग सगळेच देवाचा धावा करत होते
शेवटी कसंबसं कीर्तन संपवून भाविक तिथून उठून निघून गेले पण तरीही इथं भूत आहे अशी शंका सगळ्यांना येत होती.
पण देवाच्या मंदिरात भूत कसं येईल.
दुसऱ्या दिवशी
मी त्याच रस्त्याने जात होतो तेव्हा कोणीतरी मला
काल घडलेला सगळा प्रकार सांगितला.
तेव्हा मी खूप विचार केला.
आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की काल मी मंदीरात कीर्तनाला गेलो होतो मग तिथं कीर्तनाच्या वेळी कीर्तन ऐकत असताना मी झोपी गेलो होतो.
आणि काल मंदिरात जो काही कसला तरी मोठा आवाज झाला होता ना ते दुसरं तिसरं काहीही नसून तो माझ्या घोरण्याचा आवाज होता.
तो सगळा प्रकार, प्रसंग आठवून आठवून मी पोट धरून हसायला लागलो.
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा