गाढव
नमस्कार मंडळी
मी एक साधासुधा धोबी लोकांचे कळकटलेले मळकटलेले कपडे धुऊन चार पैसे कमावतो.
खूप वर्षांपूर्वी माझ्याकडे एक गाढव होत ते आता मरण पावल पण त्याचा लेक मात्र अजूनही माझ्याकडेच काम करतोय तोही त्याच्या बापा सारखाच प्रामाणिक ,ओझी वाहणारा मालकाला देव मानणारा तो माझं सगळं ऐकायचा मी सांगेल तसाच वागायचा, मी त्याच्या पाठीवर टाकलेलं सगळं ओझं आनंदाने वाहायचा, माझ्यासाठी खूप कामं करायचा,आणि ते पण काहीच तक्रार न करता तो अगदी शाहण्या सारखं वागायचा.
पण एक दिवस त्याला काय झालं कोण जाणे
तो बांधलेली दोरी सोडून पळून गेला.
तसा कधी मी त्याला दोरीने बांधून ठेवत नाही पण चार पाच दिवस झाले तो खूपच नखरे करत होता सारखाच इकडे तिकडे सैरावैरा पळत होता म्हणून मी आज त्याला दोरीने बांधून ठेवलं होतं.
त्या दिवशी मी बाहेर गेलो असताना याने याला बांधलेली दोरी सोडून पळ काढला यांने याला बांधलेली दोरी खूप मेहनत करून झटपट करून तोडली आणि तो मुक्त झाला.
मी घरी परत येईपर्यंत घरात दुसऱ्या कोणाला या गोष्टीचा पत्ता सुध्दा लागला नव्हता .
मी घरी परत आल्यावर मला हा सगळा प्रकार समजला.
मी खूप शोधाशोध केली सगळीकडे विचारपूस केली पण तरीही कोणालाच त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं.
शेवटी एक दिवस मी पोलिसांकडे तक्रार केली त्यांनीही शोधाशोध सुरू केली .
चार पाच दिवस असेच गेले.
आता मला याची खूप आठवण येत होती तो मुका प्राणी असला तरी आमचा इतक्या दिवसांचा, वर्षांचा सहवास मग मला त्याची आठवण तर येणारच ना.
एक दिवस TV वर बातमी दाखवली की एका गाढावाचा पुण्यात धुमाकूळ पण मला वाटलं की माझ्या गाढवा सारखाच दिसणारा अजून एक गाढव असेल.
दुसऱ्या दिवशी
वर्तमानपत्रांत सुध्दा तीच बातमी झळकली ती बातमी मी वाचली तेव्हा माझी खात्री पटली हे गाढव माझंच आहे.
काही दिवसांनी मी पुण्याला गेलो.
हे गाढव कधी पासून पुण्यात फिरतय.. एक माणूस म्हणाला.
हो तेच बघून मी त्याला न्यायला आलोय.. मी म्हणालो.
आता सगळ्यांना कळल होत की मी त्याचा मालक आहे त्यामुळे सगळेच माझ्याकडे त्याची तक्रार करायला येत होते.
त्या दिवशी तुमचं गाढव माझ्या दुकानात शिरलं होत त्याच्या भीतीने माझे सगळे ग्राहक पळून गेले.. एक दुकानदार मला सांगत होता.
कधी कधी तर माझ्या गाढवाने लोकांच्या घरात घुसून गोंधळ घातला होता सगळे त्याला खूप वैतागले होते, त्याच्यामुळे सगळे अगदी हैराण झाले होते, त्याच्यामुळे सगळ्यांच खाणं,पिणं, जगणं मुश्कील झालं होतं.
एक दिवस तो एका घरात घुसला होता तेव्हा त्या घर मालकाच्या पोरीला बघायला आलेले पाहुणे घरात घुसलेल्या गाढवाला बघून, घाबरून, भीतीने घरातून पळून गेले,, हे सगळं मला कोणीतरी सांगत होतं.
तो पुण्याच्या रस्त्यां वरून इकडे तिकडे सैरावैरा धावत होता रस्त्यावर चालणाऱ्यांना धक्का मारत होता कित्येकांच्या कमरेत लाथा घालून त्याने कितीतरी लोकांची कमर मोडली होती सगळे जखमी झाले होते .. असं मला कोणीतरी म्हणत होतं.
हे सगळं ऐकून मी माझ्या कपाळाला हात लावला.
मी पोलिसांची भेट घेतली.
तुमच्या गाढवा मुळे चार पाच दिवस रस्त्यावर सगळं जाम झालं होतं.. पोलिस मला सांगत होते.
आता माझा गाढव कुठे आहे.. मी म्हणालो.
माहीत नाही तुमचं गाढव आमच्या हातून निसटलं.. पोलिस म्हणाले.
पोलिसांनी माझं गाढव शोधायला माझी खूप मदत केली.
शेवटी मला माझं गाढव सापडलं ते बिचार थकून भागून रस्त्याच्या एका कडेला जाऊन बसलं होतं.
मला त्याची ही अवस्था बघून खूप वाईट वाटलं.
काही वेळातच मी त्याला माझ्या सोबत घरी घेऊन गेलो
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा