आमचे गुरुजी
माझ बालपण खेड्यातच गेलं मी शाळेत असताना आम्हाला एक नवीन विषय शिकवायला आमच्या शाळेत एक नवीन गुरूजी आले .
आमचे गुरुजी तसे अगदी फार साधे भोळे, रंगाने काळे सावळेच होते ते साधा सदरा आणि धोतर असा त्यांचा वेष असे.
ते नवीन नवीन अगदी सुरुवातीला आम्हाला शिकवायला आले होते ना तेव्हा आम्ही त्यांना खूप त्रास दिला होता ते आम्हाला अजिबात आवडत नव्हते त्यांनी आमच्या वर्गात शिकवायला येऊ नये म्हणून आम्ही काय वाटेल ते करायचो.
पण ते आमच्यावर कधीच रागावले नाहीत.
काही दिवसांनी.
नंतर नंतर गुरूजी आम्हाला खूप आवडू लागले आणि ते सुध्दा आम्हाला खूप मन लावून शिकवत होते.
त्यांच्या तासाला आम्ही विद्यार्थी गोष्टीचा तास म्हणायचो कारण ते जे काही असेल ते सगळं गोष्टींच्या रूपात सांगायचे आम्ही सगळे विद्यार्थी झाडून गोष्टींच्या तासाला बसायचो त्यामुळे आम्हाला अभ्यासाची गोडी लागली.
आता आमची वार्षिक परीक्षा जवळ आली होती.
अहो गुरूजी यंदा वार्षिक परीक्षेचा काय हालहवाल,. कोणीतरी म्हणालं.
होय आता तोंडावरच आली आहे वार्षिक परीक्षा ,. गुरूजी म्हणाले.
वार्षिक परीक्षेचा दिवस उजाडला.
आम्ही सगळे विद्यार्थी खूप घाबरलो होतो पण आम्ही सगळ्यांनी आम्हाला जमेल तसे पेपर लिहीले होते.
आणि निकालाचा दिवस उजाडला.
आणि काय आश्चर्य आमचा वर्ग निकालात सगळ्यांत पुढे होता.
आम्ही सगळे खूप आनंदात होते
आमच्या गुरुजींनी आमच्या अभ्यासावर खूप मेहनत घेतली होती आमच्या शाळेने या गोष्टीची दखल घेतली
शाळेच्या वतीने गुरूजींचा जंगी सत्कार करण्यात आला.
काही वेळाने सत्कार समारंभच्या ठिकाणी एक घटना घडली.
थांबा हा माणूस शिक्षक नाही तर एक दरोडेखोर आहे .. पोलिस म्हणाले.
अहो फौजदार साहेब हे काय बोलताय तुम्ही ,. गावकरी म्हणाले.
हे आमचे गुरुजी आयेत,. विद्यार्थी म्हणाले.
खरं तेच सांगतोय मी., पोलिस म्हणाले.
नाव नाय खोटं बोलताय तुम्ही., गावकरी म्हणाले.
तेवढ्यात एक माणूस तिथे आला.
इन्स्पेक्टर साहेब पकडा याला हा तोच चोर आहे., तो माणूस म्हणाला.
चला रे पकडा याला,. पोलिस म्हणाले.
थांबा थांबा,. गावकरी विनवणी करत होते .
पोलिस गुरूजींना पकडून घेऊन जात होते.
तेवढ्यात गुरूजी बोलू लागले..
हे फौजदार साहेब खरं बोलत आयेत मी शिक्षक नाय तर एक चोरच हाय मी या साहेबांच्या
घरातून चोरी करून पळालो अन या गावात आलो या शाळत एका मास्तराची नड हाय असं मला कळलं म्हणून मी या शाळत आलो तेवढीच माझ्या पोटापाण्याची सोय झाली मला चार पैसे कमवता आले मी इथंच राहातं होतो गावातल्या बायकांनी माझी खाण्यापिण्याची सोय केली गावकऱ्यांनी मला लयं माया लावली प्रेम दिलं या पोरांनी मला लयं जीव लावला अन मग मला बी यांचा लयं लळा लागला.
गुरूजी सांगतच होते..
पण तु माझ्या घरातून आमच्या मौल्यवान वस्तू चोरल्यास त्याच काय.. तो माणूस म्हणाला.
साहेब मी तुमच्या सगळ्या मौल्यवान वस्तू तुम्हाला परत देतो मग तर झालं पण मला सोडा., गुरुजी म्हणाले.
त्यांनी त्या माणसाला त्याच्या सगळ्या मौल्यवान वस्तू परत दिल्या.
त्या माणसाला गुरूजींची खूप दया आली आणि त्याने त्याची तक्रार मागे घेतली.
आमचे गुरुजी सुटले.
काही दिवसांनी
आता गुरूजींनी शिक्षकी पेशाच सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि ते अजूनही आमच्याच शाळेत आम्हाला आमचे गुरूजी म्हणूनच शिकवत होते.
काही वर्षांनंतर.
आता आमचे गुरुजी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक झाले होते
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा