कोंबड
आज गटारी अमावस्या होती म्या लय खूशीत होतो आज एक चांगलं कोंबड कापायचा अन मस्तपैकी दाबून चिकन खायचा माझा बेत होता.
म्या काय आज कामावर गेलोच नाय म्हणून म्या जरा उशीराच उठलो एकदम झ्याक आंघोळ पांघोळ करून म्या कोंबड आणायला गेलो.
तर तिथं लयं लाईन होती गर्दी होती तिथं उभ राहून राहून माझे पाय दुखायला लागले.
मग म्या दुसऱ्या दुकानात गेलो पण तिथं बी लय गर्दी होती म्या दुसरं तिसरं असं करत करत लय दुकान हिंडलो पर सगळीकड तेच.
म्या मझ्या वाटेन घरी जात असतानाची गोष्ट हाय.
मला एक कोंबड रस्त्यानं जाताना दिसलं म्या त्याला पकडायला पार गावाच्या वेशीपर्यंत गेलो पण ते कोंबड माझ्या हातून निसटलं ते निसटलच
शेवटी मला घरी परत यायला संध्याकाळ झाली मग घरात जे काय असलं नसलं ते खाऊन पिऊन म्या झोपलो
शेवटी माझा गटारीचा दिवस वाया गेला
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा