गुलाब

कॉलेज मध्ये असताना मी खूप सुंदर दिसायचे तशी आताही मी सुंदरच दिसते पण तरीही .

मी कॉलेज मधली सगळ्यात हुशार मुलगी होते सगळ्यांची जान होते मी सगळ कस अगदी छान चाललं होतं .


पण इतकं सगळं असुनही मला एकाच गोष्टीची खंत वाटत होती.

ती गोष्ट म्हणजे मी  इतकी हुशार आणि सुंदर असुनही मला कोणीच कधीच प्रपोज केलं नव्हतं बहुतेक आमच्या कॉलेज मधली पोरं मला घाबरत असावी असं  मला वाटतंय.

त्या दिवशी मी माझ्या घराची साफसफाई करत होते तेव्हा मला एक पाकीट सापडलं.

दोन दिवसांनंतर.

मी ते पाकीट उघडलं त्या पाकीटात एक पत्र होतं.

मी ते पत्र वाचू लागले.

प्रिय शरू 

आज मी पहिल्यांदाच तुझ्या समोर माझं तोंड उघडतोय कदाचित तु मला ओळखणार सुध्दा नाहीस पण मी तुला खूप चांगलंच ओळखतो.

अग आपण दोघं एकाच कॉलेजमध्ये,एकाच वर्गात होतो 
वर्गात तु खूप हुशार होतीस आणि आताही तु हुशारच असशील याची खात्री आहे मला.

तूझया सारखी हुशार आणि सुंदर मुलगी आमच्या वर्गात आहे 
त्याच आम्हाला सगळ्यांना खूप समाधान वाटायचं  


आता मी तुला माझ्या बद्दल सांगतो.

मी तुझ्या नंतर आपल्या वर्गात आलो होतो तेव्हा तुझी अभ्यासातील हुशारी बघून आणि तुझी कीर्ती ऐकून माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप आदर निर्माण झाला.

तुझा friends group खूप मोठा होता मलाही तुमच्यात यायचं होतं पण मी थोडासा शांत, अबोल असल्याने मला ते कधीच जमल नाही याची मला खूप खंत वाटते ग.

आणि तुझ्याशी तर काय आणि कसं बोलावं हे मला कधी कळलच नाही मी  तुझ्या पासून कायम दूर दूरच असायचो पण तुझा चांगला स्वभाव मला खूप आवडतो ग तु सगळ्यांना मदत करतेस ना ते पण मला खूप आवडत एक दिवस तर तु तुझ्या नकळत माझी पण मदत केलीस मला माहीती आहे तुला ते पण आठवत नसेल पण मला आठवतंय ना एक दिवस कोणीतरी  माझ्यावर कसलातरी आळ घेतला होता तेव्हा आपले सर मला कॉलेज मधून बाहेर काढत होते पण फक्त तुझ्यामुळे मी वाचलो वर्गातल्या कोपऱ्यातल्या बेंचवर बसून तुझ्यावर मनापासून, मनसोक्त लाईन मारावी असा विचार माझ्या मनात अनेकदा येऊन गेला पण फक्त माझी तशी  हिंमत  कधीच झाली नाही प्लीज आता यावर हसू नकोस प्लीज त्या दिवशी कॉलेजच्या संस्कृतीक कार्यक्रमात तु खुप सुंदर दिसत होतीस पण तुला पाहताच क्षणी मी वेडाच झालो आणि माझे शब्द माझ्याच ओठांवर थांबले 
आता अजून काय काय सांगू तसं सांगायला अजून खूप काही बाकी आहे पण आता ते सगळं जाऊदे मी आता थेट मुद्द्यावरच येतो तर शरू मी काय म्हणतोय 
मला तु खुप आवडतेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तुझ्या समोर येऊन तुला हे सगळं सांगायची हिंमत माझ्यात नाही म्हणून मी हे पत्र गुपचूप तुझ्या बॅगेत ठेवतोय माझं पत्र वाचून जर तुला  माझा राग आला  असेल तर मनापासून sorry   मला माफ कर 
कळावे 
फक्त तुझाच 

ते पत्र वाचून खरंतर मला खूप आनंद झाला होता पण तरीही मला अजूनही  कळत नव्हतं की हे  पत्र नक्की कोणी लिहीलंय ते मी विचारात पडले पण मला त्याच अक्षर ओळखीचं वाटत होतं.


मी माझ्या मित्र मैत्रिणींना फोन करून चौकशी केली आणि त्याचा नंबर मिळवला.

मी त्याला फोन केला 

हॅलो कोण बोलतय.. तो म्हणाला.

मी शरू बोलते शरू ओळखलस ना मला.. मी म्हणाले.

माझा आवाज ऐकून त्याला खूप आनंद झाला.

हो बोल ना कशी आहेस काय म्हणतेस.. तो म्हणाला.

मला तुला भेटायचंय भेटशील का मला.. मी म्हणाले.

हो नक्कीच.. तो म्हणाला.


काही वेळाने 

आम्ही दोघ एका गार्डन मध्ये भेटलो मी त्याला ते पत्र दाखवलं पत्र बघून तो आनंदाने वेडापिसा झाला.

हे पत्र तु वाचलस,. तो म्हणाला.

हो.. मी म्हणाले.

कधी.. तो म्हणाला.

आताच दोन दिवसांपूर्वी., मी म्हणाले.

मग आता काय विचार आहे तुझा.. तो म्हणाला.

मी काहीच बोलले नाही.

त्याने लिहिलेल्या पत्राच्या पाकीटाच्या मागे काहीतरी होतं पण ते माझ्या लक्षात आलं नाही.

त्याने पत्राच्या पाकीटाच्या मागे लपून ठेवलेला गुलाब माझ्या समोर धरला त्याने मला एकदम  romantic स्टाईल मध्ये  प्रपोज केलं.


शेवटी माझं स्वप्न पूर्ण झालं आणि अखेर मला गुलाब मिळालाच.

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण