गैरसमज

तो माझा खूप चांगला मित्र होता म्हणजे आहे आम्ही दोघं एकमेकांचे सगळ्यात जवळचे मित्र आहोत 

वीस वर्षांनंतर 

तो आलाय का ग,, मी म्हणाले.

ते तुलाच माहिती ना तुझाच सगळ्यात जवळचा मित्र आहे ना तो,. माझी मैत्रीण म्हणाली.

मी शांत झाले.

काही वेळाने 

तो कॉलेजच्या गेट मधून आत येताना दिसला.

मला खूप आनंद झाला.

सगळे एकमेकांना भेटले सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगल्या. 

आम्ही दोघं एकमेकांना पाहण्यासाठी धडपडत होतो 
एकमेकांशी बोलण्यासाठी कासावीस झालो होतो पण.

ना तो माझ्याशी बोलत होता ना मी त्याच्याशी.

काय बोलाव, कसं बोलावं तेच कळत नव्हतं 

शेवटी दोघंही बोलायला लागलो पण अजूनही आमच्या दोघांच्याही नजरेत अपराधी पणाची भावना आणि वागण्यात परकेपणा होताच.

आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या.

काय करतोस सध्या,. मी म्हणाले.

काही नाही तु बोल ना,. तो म्हणाला.
.
अरे सगळे भेटतील म्हणून आले.. मी म्हणाले.

हो बर झालं आलीस,. तो म्हणाला.

थोडा वेळ असाच गेला.

मला माहित नव्हतं तु येणार आहेस ते,. मी म्हणाले.

आलोय ना आता,. तो म्हणाला.

मी माझ्या मैत्रीणी बरोबर आले., मी म्हणाले.

तुझ्याकडे माझा नंबर नाही का.‌ तो म्हणाला 

आहे., मी म्हणाले.

मग मला फोन करायचा ना.‌,. तो म्हणाला.

त्या दिवशी  रागाच्या भरात तु मला block केलंस आणि मग आपली मैत्री तुटली तु मला कधीच unblock  केलं नाहीस., मी म्हणाले.

तो काही क्षण भुछकाळात हरवला.

त्या दिवशी आपल्या मैत्रीणीचा birthday होता तुला पण तिच्या birthday  ला जायचं होतं हे मला माहीत  नव्हतं नाहीतर मी तुला पण घेऊन गेलो असतो पण मी तिकडून आल्यावर  तु मला खूप बोललीस तुझा राग मला सहन होण्याच्या पलीकडे गेला म्हणून मी तुला block  केलं,. तो म्हणाला

त्याने एका दमात सगळ सांगून टाकलं.

अरे पण मी तुझ्यावर रागावलेच नाही उलट मला वाटलं की तुच माझ्यावर रागावला असशील मी तुझ्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण तु काहीच प्रतिसाद दिला नाहीस मला वाटलं की तुला माझ्याशी बोलायचच नसेल मग मी तो विषय सोडून दिला मी कुठेही बाहेर फिरायला गेले तरी मला कायम असं वाटायचं की तु कुठेही दिसशील रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक माणसांत मला तुझाच चेहरा दिसायचा कधीतरी तु मला परत भेटशील, माझ्याशी बोलशील असं वाटायचं मला या वीस वर्षांत मी तुला खूप  miss केलंय  friendship day  च्या दिवशी तुला फोन करायला मोबाईल हातात घेतला की मग आठवायच की तु मला block केलं आहेस म्हणून तर किती वेळा माझ्याकडून तुला तुझं birthday wishes  करायचं पण राहून गेलं तेव्हा मला प्रश्न पडला की आता मी खोटं खोटं कोणाशी भांडू,,कोणाची मस्करी करू, मला अभ्यासाचं टेन्शन आलंय हे कोणाला सांगू  ,कोणाचं डोकं खाऊ असे अनेक प्रश्न मला पडले होते तु माझा best friend आहेस तु मला block  केलंस याचा मला खूप त्रास झालाय 

अरे यार म्हणजे तु माझ्यावर रागावली नाहीस,. तो म्हणाला. 

त्याच्या बोलण्यात एक वेगळाच आनंद होता.

या वीस वर्षांत मी पण तुला खूप miss केलंय ग  कधीकधी वाटायचं की तुझ्याशी बोलून सगळं मिटवून टाकावं पण मग मला तुझा राग आठवायचा तुला भेटून बोलू असा विचार मी केला होता पण तुझ्या समोर येण्याची  माझी हिम्मतच झाली नाही कधी म्हणजे एका शिल्लक आणि फालतू कारणाने आपणं एकमेकां बद्दल उगाच गैरसमज करून घेतला आपण दोघंही चुकलो म्हणजे आपण इतकी वर्षे न केलेल्या चुकीची शिक्षा भोगत होतो गैरसमज माणसाला कोणतंही नातं तोडायला भाग पाडू शकतो., तो म्हणाला.


म्हणजे आपण दोघंही एकमेकांच्या रागाला घाबरतो आम्ही दोघं., एकदमच म्हणालो.

आम्ही दोघ एकमेकांच्या भाबडेपणा वर खळखळून हसलो.

तुम्ही एखाद्याला block करता तेव्हा ज्याला block करता त्या व्यक्तीला त्याचा किती त्रास होतो याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

कोणताही गैरसमज आपण एकमेकांशी बोलून दूर करू शकतो एकवेळ एकमेकांना बोला ,एकमेकांवर रागावा, एकमेकांशी भांडा, पण असा नंबर block करून एकमेकांना परकेपणा ची जाणीव करून देऊ नका अस एकमेकांना सोडून  जाऊ नका एका छोट्या गोष्टी साठी इतक्या वर्षांची मैत्री तोडू नका.

जमल्यास एकमेकांना माफ करा.

कारण कुठल्याही गोष्टींपेक्षा मैत्री जास्त महत्त्वाची आहे 


कोणाचाही नंबर block  करताना शंभर वेळा विचार करा एखाद्या व्यक्तीला block  करून आठवणी विसरता येत नाहीत आणि मैत्री तर कधीच संपत नाही 


✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण