सोळावं वरीस धोक्याच

 दोन वर्षांनंतर 

मला तो खूप आवडायचा म्हणजे अजूनही मला तो खूप आवडतो  पण आता तो नेमका कुठे आहे हे मला माहीत नाही.

आम्ही दोघं एकाच गावात राहायचो पण तरीही आमची एकमेकांशी फारशी ओळख  पाळख नव्हती.

नंतर आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना योगायोगाने आम्ही एकाच वर्गात होतो हळूहळू आमची ओळख झाली व नंतर आमची मैत्री झाली 

काही दिवसांनी 


त्याचा दयाळू स्वभाव , सगळ्यांची मदत करणं , त्याच माझ्या सोबत असणं, माझी काळजी घेणं हे सगळं हळूहळू मला आवडत गेल.

पण मी त्याला काही सांगायच्या आधीच तो दुसऱ्या कॉलेज मध्ये निघून गेला.


आणि माझ्या मानातल माझ्या मनातच राहून गेलं.

आज मला त्याची खूप आठवण येत होती.

काही दिवसांनी 

आमच्या कॉलेजमध्ये संस्कृतिक कार्यक्रम होता.

अरे मला खूप कंटाळा आलाय,. मी म्हणाले.

कसला माझा  कंटाळा आलाय की काय तुला तु या दोन वर्षांत कंटाळलीस मला., तो मसकरीत म्हणाला.

नाही तुझा नाही रे या पाठांतराचा कंटाळा आलाय मला 
,. मी म्हणाले.

त्याने माझ्याकडून माझं पाठांतर करून घेतलं.

काही वेळाने 

थोड्यावेळाने मी स्टेजवर गेले पण सगळ्यांसमोर मला काही बोलताच येईना मी खूप बावरले होते माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही  माइक माझ्या हातून खाली पडणारच होता पण तेवढ्यात त्याने मला सावरल आणि मी आत्मविश्वासाने माझं सादरीकरण पुर्ण केलं त्यासाठी मला बक्षीस सुध्दा मिळालं 

काही दिवसांनी 

आज पावसाला खूप जोर आलाय,. तो म्हणाला.

 येऊ दे की मग,. मी म्हणाले.

अग आपण घरी जाताना हा पाऊस थांबला पाहिजे,.तो म्हणाला.

थांबेल की,. मी म्हणाले

काही वेळाने 

जाताना वाटेत आम्हाला  खूप पाऊस लागला 

मला पावसात भिजायला खूप आवडतं आणि तुला.‌ मी त्याला विचारलं.

मला पण ,.तो म्हणाला 

आम्ही दोघं मस्त पावसात भिजलो.

थोड्यावेळाने मी घरी आले.

काही वेळाने 

मी त्याला फोन केला.

मला खूप ताप आलाय मला झोप येत नाही माझ्याशी गप्पा मार ना गोष्ट सांग ना मला,. मी म्हणाले.

आम्ही खूप गप्पा मारल्या त्याने मला गोष्ट सांगितली आणि मी थोड्यावेळात छान , शांत झोपी गेले.

काही दिवसांनी 

आम्ही सगळे सहलीला गेलो होतो 

दोन चार दिवस असेच मजेत गेले 


आणि एक दिवस अचानक 

आम्ही फिरायला गेलो असताना मी गर्दीत हरवले 
सगळ्यांनी मला खूप शोधलं तो पण मला शोधून शोधून थकला .

त्याचा जीव माझ्या काळजीने कासावीस झाला होता.

काही वेळाने 

मी रूमवर परत आले.

कुठे गेली होतीस तू आम्ही सगळे तुला शोधून शोधून थकलोय पण तुझा काहीच पत्ता नाही ., तो म्हणाला.

त्याने माझा चांगलाच समाचार घेतला.

अरे  मी गर्दीत गोंधळून गेले आणि  मग वाट चुकले,. मी म्हणाले.


दुसऱ्या दिवशी पासून तो माझी खूप काळजी घेऊ लागला.


हळूहळू माझ्या मनात काहीतरी उमलू लागलं एक अनामिक ओढ , काळजी आणि बरंच काही. 

पण ते नक्की काय आहे हे मला कळतंच नव्हतं मला नक्की काय होतंय हे मला शब्दात सांगता येईना .

पण  त्याच माझ्या सोबत असणं मला खूप आवडू लागलं होतं 

त्या कोवळ्या वयात माझ्या मनात त्या कोमल भावना उमलत होत्या.

थोड्यावेळाने मी भानावर आले.


त्याच्या आठवणीने व्याकुळ होऊन मी कॉलेजला गेले 

थोडावेळ असाच गेला.

मला तो दिसला मला खूप आनंद झाला 

तु इथं कशी तु   नवीन ऍडमिशन घेतलं का., तो हसत हसत म्हणाला..

मी असंच आले., मी म्हणाले..

मी पण असंच फेरफटका मारायला आलो होतो., तो म्हणाला.

ओके., मी म्हणाले.

ऐक ना मला तुझ्याशी बोलायचय,. तो म्हणाला.

हो बोल ना., मी म्हणाले.

मला तु खुप आवडतेस ., तो म्हणाला.

त्याच बोलणं ऐकून मी चकित झाले..

मला पण तु खूप आवडतोस., मी म्हणाले.

लग्न करशील माझ्याशी . तो म्हणाला.


आम्ही दोघं एकमेकांना प्रपोज करत असताना कुठेतरी दुरवर सोळावं वरीस धोक्याच हे गाणं लागलं होतं.


त्या कोवळ्या वयात सगळ्यांच्याच मनात  त्या कोमल भावना येतातच  सगळेच त्या वयात कधी ना कधी प्रेमात पडतात फक्त ते प्रेम आहे की अजून काही ते कोणालाच कळत नाही .


फक्त ते प्रेम  खरं असलं पाहिजे 
 

✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड 


















.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भेट

माझं स्वयंवर

रूसलेली मैत्रीण