हरवलेली मैत्रीण
तो आता खूप थकला होता तो कधीही मरेल असं सगळ्यांनाच वाटत होतं पण तो कोणत्या आशेवर जगत आहे हे कोणालाच माहीत नव्हतं पण तरीही तो जगत होता..
त्याच्या अंगात जराही जीव नव्हता सगळेच त्याला घरी येऊन भेटून जात होते .
आपल्या कॉलेज मध्ये get together आहे अशी बातमी त्याच्या कानावर आली त्याच्या अंगात नवा उत्साह संचारला त्याला थोडं बरं वाटायला लागलं त्याने कॉलेजला जायचं ठरवलं
त्याचे डोळे म्हातारपणात अधू झाले होते पण तरीही त्याची नजर तिलाच शोधत असायची.
आज कॉलेजच्या get together ला काहीही करून तिला भेटायचच असं त्याने ठरवलं होतं पण ती येईल की नाही हे त्याला माहीत नव्हतं पण तरीही तो तिची वाट पाहत होता
आज खूप वर्षांनी कॉलेजच्या get together ला त्याला ती दिसली
त्याला खूप आनंद झाला.
अग ओळखलस का मला., तो तिच्या समोर जाऊन बोलू लागला
काही वेळाने
ती सगळ्यांशी मस्त गप्पा मारू लागली पण ती त्याच्याशी एकही शब्द बोलत नव्हती.
त्याला खूप वाईट वाटलं तो पुन्हा पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती काहीच प्रतिसाद देईना.
नमस्कार माझ्या बायकोला विस्मरणाचा आजार आहे तिला काही आठवत नाही तिला बरं वाटावं म्हणून मी तिला इथं घेऊन आलोय., तिचा नवरा त्यला सांगत होता.
हो पण ती सगळ्यांशी बोलते की,. तो म्हणाला.
हो तो एक चमत्कारच आहे तिला सगळ आठवतंय वाटतं ,. तिचा नवरा म्हणाला.
मग मीच कसा आठवत नाही तिला,. तो मनातल्या मनात म्हणाला.
त्याला काहीतरी आठवलं
अरे ती तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण तुला प्रपोज करणार आहे,. त्याचा मित्र त्याला सांगत होता.
त्याच्या मित्राच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला.
आणि दुसऱ्या दिवशी पासून तो तिला टाळू लागला.
नंतर काही दिवसांनी त्याच्या वागण्याचा त्याला खूप पश्चात्ताप झाला पण तोपर्यंत कॉलेज संपलं होतं आणि ती कुठेतरी दूर निघून गेली होती.
तो भानावर आला.
त्याने पुन्हा पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या तिला तो आठवतच नव्हता.
कोण आपण आपण एकमेकांना ओळखतो का,. तिने अनोळखी नजरेने त्याच्याकडे पाहत त्यालाच विचारलं.
तो निशब्द झाला त्याच्या डोळ्यातल पाणी काही केल्या थांबत नव्हतं.
तिनं माझ्या प्रेमात पडू नये म्हणून मी तिला टाळत होतो पण आता ती मला कायमचं विसरून गेली,. तो रडवेला होऊन त्याच्या मित्राला म्हणाला.
काही वेळाने
कोण तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही,. तो त्याच्या मित्राला म्हणाला.
आता तोही सगळं विसरला होता आता त्याला फक्त तीच आठवत होती.
एखाद्याला इतकही egnore करू नका की त्या व्यक्तीला तुम्हाला विसरण भाग पडेल.
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा