भूकंप
आमच्या गावात खूप मोठा भूकंप झाला सगळं उध्वस्त झाल होत्याच नव्हत झाल
काळानं घाला घातला सगळ्याची सगळी स्वप्नं एका क्षणात उद्ध्वस्त झाली.
आमच्या गावातला किशोर सुट्टीला गावी आला होता .
किशोर तसा खूप हुशार पोरगा तो जास्त गरीब पण नव्हता अन लय पैसेवाला बी नव्हता पण त्याला शिकण्याची आवड होती पोरगा जिद्दीनं शिकत होता.
त्याच शिक्षण आता पुर्ण होत आलं होतं आता त्याची आई त्याच्या लग्नाचा विचार करत होती तिने त्याच्यासाठी पोरी बघण्याचा घाट घातला.
दुसऱ्या दिवशी तो एक पोरगी बघायला जाणार होता.
पण कधी काय होईल ते सांगता येत नाय आपल्या हातात काहीच नसतं
काही दिवसांनी एक दिवस अचानक.
आकाशात रातीच चांदणं पडलं होतं सगळे निवांत झोपले होते ..
पण रात जशी जशी सरत गेली तसं आकाशीच चांदणं ढगाआड गेल अन् काळाकुट्ट अंधार पडला पण तो अंधार कधी सरणार नाय हे कोणालाच माहित नव्हतं.
किशोर गाढ झोपेत होता तो कोवळ्या वयाचा पोरगा शांत निजला होता,
थोड्यावेळान अचानक
जमिनीला हदरा बसला देवाचा कोप झाला धरणी माय रागावली भूकंप झाला भूकंप झाला असं काही लोक ओरडत होते सगळा गोंधळ उडाला सगळीकडे धावपळ सुरू झाली सगळ्यांची झोपच उडाली कोणालाच काहीच सुचत नव्हतं..
घरदार, वाडे, सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झाल काहीच वेळात सगळ्यांना भूकंपाची बातमी कळली आम्हाला मदत मिळाली देवाच्या कृपेने आम्ही सगळे वाचलो.
पण म्हणतात ना काळा समोर कोणाचं काही चालत नाही.
फौजदार साहेब आणि काही साहेब लोकांनी आम्हाला वेळेवर घराबाहेर काढलं आणि आमचा जीव वाचला
.
पण या सगळ्या धावपळीत आमचा किशोर घरातच झोपलाय हे कोणालाच लक्षात आलं नाही .
आमची घरदार उध्वस्त झाली पण आमचा जीव तरी वाचला पण आम्ही आमच्या लेकराला आमच्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं.
त्याचं घर पडलं त्यात त्याचा जीव गेला त्याच्या आई बापानं टाहो फोडला सगळ्यांना धक्का बसला सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं होत्याच नव्हत झालं तो कोवळ पोरं कोवळ्या वयातच गेला.
काळ आला जीवावर
भरवसा ठेवू कशावर
बघ र बाबा देवा
आता तुच सावर
नैसर्गिक आपत्तीत कोणालाच काहीच कळत नाही एका क्षणात सगळं संपत पुर, वादळ, भूकंप या संकटात सगळ उध्वस्त होत. आयुष्य जगायचं राहून जात कोणतीही नैसर्गिक आपत्ती वाईटच.
कोणत्याच नैसर्गिक आपत्तीला आपल्या माणसाला गमवायच
दुःख कळत नाही ती फक्त येते आणि जाते पण जाताना सोबत आपली माणसं, आपली स्वप्नं सगळं काही घेऊन जाते आणि हे दुःख आयुष्यभर कायम आपल्या मनात सलत असते.
✍️ कवयित्री लेखिका श्रावणी संदीप गुंड
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा